कात्रज जुन्या बोगद्याजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू , पुण्यात बिबट्याचा वावर

विशाल भालेराव 

कात्रज जुन्या  बोगद्याजवळ दुखण्याचा वाहनांच्या धडकेत मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मध्यरात्री हा प्रकार घडला आहे एकीकडे प्रशासन प्राण्यांना वाचवण्यासाठी अनेक कार्यक्रम करत असताना नागरिक त्यांना जुमानत नसल्याचे दिसत आहे. तसेच वनविभागाला याची माहिती दिली त्यानुसार वनविभागाचे अधिकारी तसंच पोलीस दाखल झाले. 

बिबट्याच्या  डोक्याला धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे .मात्र बेधडक वाहन चालकांमुळे प्राण्यांचे प्राण जात आहेत. या घटना आधीही घडल्या आहेत. मात्र ते वाहन चालक सापडत नाहीत. किंवा तितक्यात गंभीर त्याने त्याचा तपास केला जात नाही. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला कात्रज बोगद्याजवळ पुण्याकडे येत असताना मध्यराञी दोन वाजण्याच्या सुमारास मृत अवस्थेत बिबट्या पडला असल्याची माहिती मिळाली ही माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी बीट मार्शल पोलीस नाईक ललित मोहिते, सुहास पवळे ,रणजीत काटे यांनी त्याला रस्त्याच्या बाजूला घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.