आगामी निवडणूकीत राष्ट्रवादी युवक संघटना अधिक सक्षमपणे काम करणार- विशाल वाकडकर

 

2022 च्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी युवकांची तयारी सुरु.....विशाल वाकडकर

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची शहर कार्यकारिणी जाहिर

पिंपरी (दि. 17 ऑगस्ट 2020) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगिण विकास केला. सुनियोजित विकासाचे रोल मॉडेल म्हणून देशभर पिंपरी चिंचवड शहराचा उल्लेख केला जातो. याचे श्रेय दुरदृष्टीने धडाडीचे निर्यण घेणा-या अजित पवार यांना आहे. शहराला पवना धरणापासून बंद पाईप लाईनव्दारे पाणी पुरवठा योजना, भामा आसखेड पाणी पुरवठा योजना, निगडी ते दापोडी आणि हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो हे प्रलंबित प्रकल्प पुर्ण झाले पाहिजेत. तसेच शहरातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना शहरातच रोजगार मिळण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 2022 च्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सत्ता आली पाहिजे. यासाठी पक्षाची ध्येय धोरणे तसेच शरद पवार व अजित पवार यांनी राज्यभर केलेल्या विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व युवकांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजोग वाघेरे पाटील यांनी केले.

        पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या कार्यालयात रविवारी (दि. 16 ऑगस्ट) युवक कॉंग्रेसचा पदनियुक्ती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, लाला चिंचवडे आदी उपस्थित होते.

       यावेळी रविकांत वर्पे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली मागील तीन वर्षात महानगरपालिकेतील भ्रष्ट कारभाराविरुध्द वेळोवेळी आंदोलने करुन जनजागृती केली. आता 2022 च्या महानगरपालिकेच्या निवडणूकीत युवकांना मोठ्या प्रमाणात संधी द्यावी, यासाठी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करु.

         विशाल वाकडकर यांनी सांगितले की, मागील सहा वर्षात भाजप प्रणित केंद्र सरकारने चुकीची ध्येयधोरणे राबविल्यामुळे देशभर बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे देशभरातील युवकांमध्ये भाजपाच्या विरोधात तीव्र नाराजी आहे. युवकांची ही शक्ती आगामी निवडणूकांमध्ये महत्वपुर्ण भूमिका बजावणार आहेत. 2022 ला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. या निवडणूकीत राष्ट्रवादी युवक संघटना अधिक सक्षमपणे काम करणार आहे. त्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. गेल्या अडीच वर्षापासून शहर युवक संघटनेने लोक नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, युवा नेते पार्थ पवार तसेच मेहबूब शेख, रविकांत वर्पे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध प्रश्नांवर रस्त्यावर उतरुन आंदोलन निदर्शने करुन जनजागृती केली. यामध्ये रिंग रोड, शस्तिकर माफी, अनधिकृत बांधकाम, तरुणांच्या बेरोजगारी विरोधात वडा पाव तळून आंदोलन केले, महागाई विरोधात बैलगाडीतून गाजर यात्रा, शैक्षणिक शुल्क दरवाढ, वीज बिल दरवाढ, पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात आंदोलन, महानगरपालिकेतील भाजप पक्षाच्या भोंगळ कारभाराविरोधात जवाब दो आंदोलन अशी 45 हून जास्त आंदोलने केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुला मुलींसाठी क्रिडा विषयक उपक्रम राबविले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हॉकीच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेळावे, विधानसभा आणि प्रभागस्तरीय बैठका घेऊन संपर्क अभियान राबविण्यात आले. यातून हजारो युवक राष्ट्रवादीशी जोडले गेले. युवक संघटनेचा अधिक विस्तारासाठी नवनियुक्त कार्यकर्त्यांनी आणखी जोमाने काम करावे, असे आवाहन विशाल वाकडकर यांनी केले.

      यावेळी शहर सरचिटणीस ऋषभ भरत काटे, विराज दत्तात्रय काळभोर, संकेत नंदकुमार इंगवले, आयुष निंबाळकर, अमोल बाळासाहेब देवकर तसेच शहर उपाध्यक्ष भट्टू प्रकाश शिंदे, पवन गंगाधर जवळकर, विशाल मुकूंद उबाळे, गौरव सचिन शितोळे, सुशिल कुमार घग, शहर सचिव प्रदिप प्रकाश आवटी, शहर संघटक तेजस शंकर चिकणे, चिंचवड विधानसभा सरचिटणीस प्रणव प्रकाश ढमाले, पिंपरी विधानसभा संघटक शेहबाज नाजीर शिकलगार, पिंपरी विधानसभा सरचिटणीस दयानंद मोरे, विराज कुटे, भोसरी विधानसभा संघटक शैलेश विश्वनाथ मोरे, कौस्तुभ संतोष वाळके, आकाश पवार, भोसरी विधानसभा सरचिटणीस स्वप्निल विठ्ठल माने, भोसरी विधानसभा सचिव श्रीयश अनिल चिखले तसेच चेतन जभम्बले, केतन जाधव, गणेश गाडेकर, वसिम बागवान, स्वप्निल काटे, अभिषेक जमादार यांना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

सुत्रसंचालन विशाल काळभोर, आभार लाला चिंचवडे यांनी मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.