विशाल भालेराव
सिंहगड टाईम्स- खानापूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधीला पंचायत समिती हवेली पुणे विभाग-स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण )तर्फे आयोजित " गंदगी मुक्त भारत अंतर्गत निबंध स्पर्धेत गो-हे केंद्रात प्राची दत्तात्रय कुंभार हिने प्रथम क्रमांक आणि समृद्धी राहुल जोरी हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला." गंदगी मुक्त माझं गाव " या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.त्याचबरोबर श्रेया साळवे,वैष्णवी जावळकर,आकाश पाटील,तेजस नलावडे,आरती राऊत यांनीही सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन जेष्ठ शिक्षक शशिकांत जाधव यांनी केले. विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल प्राचार्य सुनिल कदम,पर्यवेक्षक म्हाळसाकांत खेडेकर,गो-हे केंद्र प्रमुख किसन गोरे ,शिक्षिका स्वाती पवार भीमराव आदलिंग,जेष्ठ सेवक रमेश जावळकर यांनी अभिनंदन केले. व्यंकटेश्वरा स्कूल ची विद्यार्थीनी वैभवी चंद्रशेखर ढमढेरे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.