विशाल भालेराव
सिंहगड-दि.१८ वरदाडे येथील राष्ट्रीय पेयजल योजने चे ९९ लाख रुपयांचे काम अंतिम टप्प्यात असून या योजनेतुन पिण्याच्या पाण्याची विहीर, मुख्य पाण्याची पाईप लाईन, पंप हाउस रूम, वसवेवाडी मध्ये पाण्याची टाकी व संपुर्ण गावा मध्ये अंतर्गत पाइप लाइन करून घरोघरी पाण्याचे कनेक्शन देण्यात आले. आहे या योजनेमुळे वरदाडे गावातील व वसवे वाडी येथील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला असून वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुढील तीस वर्षे पाणी संबधी काही अडचण होणार नाही. या योजने करता माजी आदर्श सरपंच वंदना सचिन शेडे यांनी मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले . सरपंच विट्टल ठाकर ,माजी सरपंच प्रिती संभाजी शेडे , माजी सरपंच लता भरत जावळकर , माजी उपसरपंच दिलीप भालेराव , ग्रामपंचायत सदस्य सुरेखा यादव , ग्रामसेवक शिल्पा कांबळे , पाणी पुरवठा अधिकारी सोरटे,हभप सचिन शेडे ,माझी संरपच संभाजी शेडे , दत्तात्रय पवार, अनंता शेडे , अमोल जावळकर संतोष लोहकरे आदींनी सहकार्य केले .घरोघरी नळ पाणी येणार आसल्याने गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.