सिंहगड टाईम्स-तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंहगड खोऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल खामगाव मावळ विद्यालयांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.ग्रामपंचायत खामगाव मावळचे उपसरपंच प्रशांत दारवटकर यांनी ध्वजारोहण केले. याप्रसंगी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शिक्षक आपल्या दारी या उपक्रमाद्वारे विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पवार यांच्यासमवेत सर्व शिक्षकांनी दहावीतील विशेष गुणवत्ता प्राप्त प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांच्या घरी सस्नेह भेट देत श्रीफळ व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे प्रशस्तीपत्र देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान केला.
यावेळी मावळा जवान संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण तात्या दारवटकर, खामगाव मावळचे तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत निंबाळकर, प्रशांत भोसले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगावचे मुख्याध्यापक तुकाराम ओगलमोगले इंग्लिश स्कूल विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पवार त्यांच्यासमवेत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.