मालखेड विद्यालयास मर्सडीज बेंज कडून क्रीडा साहित्य व कपाटे देणगी स्वरूपात भेट.

 विशाल भालेराव-

सिंहगड टाईम्स- श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचालित काळभैरवनाथ माध्यमिक विद्यालय मालखेड विद्यालयास मर्सडीज बेंज लिमिटेड चाकण या कंपनीकडून ४० हजार रुपयाचे क्रीडा साहित्य व दोन कपाटे देणगी स्वरुपात देण्यात आली. कंपनीचे माजी जनरल मॅनेजर सुरेश राजवाडे तसेच विद्यमान जनरल मॅनेजर मंदार कुलकर्णी व  स्वस्तीश्री मॅडम यांच्या हस्ते साहित्य विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकुमार बारवकर यांनी स्वीकारले. यावेळी पंचायत समिती हवेली चे माजी उपसभापती किसन बापू जोरी यांच्या हस्ते सुरेश राजवाडे व मंदार कुलकर्णी यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. यावेळी विद्यालयातील

अशोक पायगुडे ,विलास जोरी, पंडित चेंडके ,शंकर भगत , भास्कर गवळी  व सचिन जोरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.