पुण्यात ‘वंचित’ने केले डफली बजाओ आंदोलन…!


 महाराष्ट्र राज्यातील एस.टी.,तसेच शहरातील पी.एम.पी. एल सेवासह सर्व प्रकारची सार्वजनिक परिवहन सेवा सुरू करावी या मागणीसाठी वंचित आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशा नुसार आज पुणे शहरातील एस.टी.महामंडळाचे विभागीय कार्यालय स्वारगेट येथील प्रवेशद्वाराजवळ तीव्र स्वरूपाचे डफली बजाओ आंदोलन करण्यात आले.

या वेळी पुणे शहरातील वंचित आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.एस.टी सेवा सुरू करा,वंचित आघाडी चा विजय असो ,अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता .या वेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विभागीय महाराष्ट्र राज्य परिवहन नियंत्रक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व वंचित आघाडीचे देखरेख समिती प्रमुख व भारिप चे शहराध्यक्ष अतुल बहुले यांनी केले .या आंदोलनात वंचित आघाडीचे नेते वसंत साळवे यांनी मार्गदर्शन केले. या आंदोलनात वंचीतचे देखरेख समिती सदस्य , भारीपाचे शहराध्यक्ष अतुल बहुले ,ज्येष्ठ नेते वसंत साळवे ,नितीन शेलार ,उत्तम वनशिव,सीमाताई भालसेन,यासह पुणे शहरातील महिला,युवक व कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.