विशाल भालेराव
सिंहगड टाईम्स-चीनी मालावर बहिष्कारासाठी 'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स' ने घेतलेल्या भूमिकेला 'फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडल' ने पाठींबा दिला आहे. 'फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडल' चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजयसिंह डुबल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
ट्रान्सपोर्ट,कॉस्मेटिक आणि सेल फोन क्षेत्रातील कंपन्यांनी देखील या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. भारतीय उत्पादनाना चालना मिळावी आणि बाजारपेठ मिळावी यासाठी स्वस्त चीनी मालाचा मोह टाळावा,असा आग्रह या प्रसिद्धी पत्रकात धरण्यात आला आहे . फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष जयेंद्र टण्णा ,राष्ट्रीय सचिव वी.के.बंसल यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे विजयसिंह डुबल यांनी सांगितले .