पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतिने वारंवार सूचना देवूनही मास्कचा वापर न करणाऱ्यांविरुध्द पुणे महानगर पालिका आणि शिवाजीनगर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने गत तीन दिवसांपासून धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. या तीन दिवसामध्ये नागरिकांवर शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्यावतिने राबविण्यात आलेल्या मोहिमेत दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये विना मास्क, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, वाहतुक नियमांचे पालन न करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनासह ईतर मुद्यांचा समावेश आहे. या मोहीमेमुळे नागरिकांनी धास्ती घेतली.
"संपूर्ण जगाला हादरवून टाकलेल्या कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी बाहेर पडायचे झाल्यास तोंडाला मास्क बांधावा, अशा सूचना वारंवार प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. याऊपरही अनेकजण या सूचनांकडे कानाडोळा करून विनामास्क घराबाहेर पडत आहेत. नागरिकांनी गाफील न राहता प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. नियमबाह्य वर्तन केल्यास निश्चितपणे कारवाईस सामोरे जावे लागेन. यामुळे सर्वांनी नियमांचे पालक करावे", असे आवाहन शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विजय कुमार शिंदे यांनी केले आहे.
शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उप निरीक्षक एस. पी. मोरे, पोलिस उप निरीक्षक संदीप चव्हाण यांच्याकडून प्रभावीपणे जंगली महाराज रस्त्यावर बालगंधर्व चौक येथे करोना पार्श्वभूमीवर प्रशासनाने लागू केलेले नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनेकजण बिनधास्त विना मास्क दुचाकीवरुन गावभर हिंडताना दिसतात, अशा नागरिकांवर आता दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे शहरातही वाढत असलेला करोनाबाधितांचा आकडा चिंताजनक असल्यामुळे पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले असून आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.