पुण्यात उपचार न मिळाल्याने पत्रकाराचा मृत्यू झाल्यानंतर पत्रकारांनी सुविधेच्या नावाखाली फक्त उदघाटन करणाऱ्या सरकारला जाब विचारायला सुरुवात केल्यानंतर आता विरोधी पक्षात असलेल्या भाजपकडून देखील आरोग्य यंत्रणेबाबत शासनाला जाब विचारायला सुरुवात झाली आहे. राहुलदादा शेवाळे ,उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष पुणे जिल्हा. यांनी सरकारने उभारलेल्या कोविड सेंटरच्या सुविधांबाबत पुणेकरांच्या वतीने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
दीडशे कोटीच्या वर खर्चून उभे केलेल्या अन मुख्यमंत्री महोदयांच्या व इतर माननीयांच्या उपस्थितीत गाजावाजा करत उद््घाटन झालेल्या पुण्यातल्या आठशे बेड्सच्या जंबो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून आयएएस अधिकाऱ्यांची फौज पुण्यात तैनात केलेली आहे .पत्रकारांनी रात्रभर यंत्रणेला जागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पांडुरंग रायकर या तरूण पत्रकाराला व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने मृत्युमुखी पडावे लागले. पत्रकारांनी शेवटपर्यंत टाहो फोडूनही यंत्रणांच्या सर्वोच्च स्थानी असलेल्यांकडून काहीच हालचाल होत नसेल तर मग सामान्य माणसाचे काय हाल होत असतील ? नियोजन, कार्यक्षमता, कळकळ या साऱ्याच बाबींमध्ये दिसतो तो यंत्रणांचा मठ्ठपणा. महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांचा आसूड हाती घेतला होता, आता गरज आहे लोकशाहीच्या चौथ्या खांबाने एकजुटीने सामान्य माणसाचा आसूड हाती घेण्याची गरज आहे. नागरी संघटनांनी पत्रके काढण्यापलिकडे जाऊन यंत्रणांना हलवण्याची. गरज आहे प्रशासनातल्या, यंत्रणांतल्या संवेदनशीलता-कळकळ असलेल्या अधिकाऱ्यांच्या हाती सूत्रे देण्याची. गरज आहे निवृत्त अधिकाऱ्यांच्या सर्वपक्षीय राजकीय नेतृत्वाने कणखर निर्णय घेत प्रशासन हलवण्याची गरज आहे. असे सवाल राहुलदादा शेवाळे ,उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष पुणे जिल्हा यांनी मांडले आहेत