स्वतंत्र अपातकालीन यंत्रणा (कक्ष) सुरु करण्यात यावा, दिपाली प्रदीप धुमाळ - विरोधी पक्षनेत्या पुणे मनपा.


पुण्यात टी व्ही ९ या वृत्तवाहिनीसाठी काम करणा-या कै.पांडुरंग रायकर यांचं बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झालं. श्री. पांडुरंग रायकर यांना दि. २१ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर श्री पांडुरंग रायकर यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू केले. २७ ऑगस्ट २०२०ला त्यांनी कोरोना चाचणी केली जी निगेटिव्ह आली. दि.२८ ऑगस्ट२०२० ला पांडुरंग रायकर हे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी गेले. मात्र तिथेही त्रास सुरू होता त्यामुळं त्यांची कोपरगावमधे एंटीजेन टेस्ट करण्यात आली जी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर रविवारी दि.३० जुलै २०२०२ला रात्री त्यांना ऍम्ब्युलन्समधुन उपचारांसाठी पुण्यात आणण्यात आलं आणि पुण्यातील पत्रकारांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने रायकर यांना जंबो हॉस्पिटलमधे भरती केलं.

जंबो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर आय. सी. यु. मधे उपचार सुरू होते. मात्र त्यांची परिस्थिती खालावत होती. त्यामुळे त्यांना दुस-या खाजगी हॉस्पिटलमधे भरती करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरू केले. मंगळवारी त्यांची ऑक्सीजन पातळी ७८ पर्यंत खाली गेली. त्यांना जंबो हॉस्पिटलम मधून दुसर्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी कार्डिॲक ऍम्ब्युलन्सची गरज होती. अशी एम्ब्युलन्स मिळवण्यासाठी मंगळवारी प्रयत्न सुरू होते .मंगळवारी रात्री एक ऍम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली पण त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाला असल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर दुसरी ऍम्ब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते पण त्या ऍम्ब्युलन्समधे डॉक्टर उपलब्ध नव्हते. पहाटे चारला एम्ब्युलन्स मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झाला पण तोपर्यंत पांडुरंगची प्रकृती आणखी खालावली होती. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे पाच वाजता ऍम्ब्युलन्स उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आणि आय सी यु मधील डॉक्टरांचा आम्ही निघतो आहोत असा फोन आला. पांडुरंगचे मित्र असलेले पत्रकार आणि त्याचे नातेवाईक जंबो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्याचं निधन झाल्याचं सांगितलं. थोड्याच वेळात कार्डिॲक एम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली पण तोपर्यंत वेळ निघून गेली, ही अत्यंत दुदैवी व दु:खद घटना असुन पुणे महानगरपालिकेस लाजीरवाणी बाब आहे.पुणे शहरामध्ये सर्व प्रकारच्या ऍम्ब्युलन्स, तज्ञ डॉक्टर व सुसज्ज हॉस्पिटल उपलब्ध असुन या सर्वांचे समन्वय होत नसल्याने अशा घटना घडत आहेत. 

अशा प्रकारे पत्रकारावर वेळ येते तर सामान्य नागरिक कोणत्या संकटातुन जात असेल याची कल्पना ही करणे अशक्य आहे. यामुळे कोरोना रुग्णांवर योग्य व वेळेवर आवश्यक उपचार व सोयीसुविधा मिळणे महत्वाचे आहे. यासाठी पुणे महानगरपालिकेचे स्वतंत्र यंत्रणा (कक्ष) उभारणे गरजेचे आहे. जिथे सामान्य नागरिकांवर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा व औषध उपचार उपलब्ध करुन देता येतील व त्याचे रोजच्या रोज अपडेट संबंधीत रुग्णांच्या नातेवाईकांना मिळेल. तसेच रुग्णांना आवश्यकता भासल्यास आय.सी.यु. ,व्हेटिंलेटर व इतर सुविधा त्वरीत मिळण्यास मदत होईल. एखाद्या रुग्णास अन्य रुग्णालयात दाखल करावयाचे असल्यास लवकरात लवकर सर्व सुविधांयुक्त ॲमब्युलन्स उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे व ते या स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातुन नियंत्रित करावे- दिपाली प्रदीप धुमाळ - विरोधी पक्षनेत्या पुणे मनपा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.