भारतीय जनता पार्टी च्या वतीने पुणे जिल्हाध्यक्ष मा.श्री गणेशभाऊ भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी मा.जयश्री कटारीया यांना सांस्कृतिक आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
गेली पाच ते सहा महिन्यापासुन या COVID 19 या माहामारीच्या संकटामुळे संगीत कला क्षेत्रातील कलाकारांची उपासमार होत आहे. राज्यात शासनाने काही प्रमाणात उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी दिली परंतु जेव्हा गर्दी होते तेव्हाच कलावंतांना कला सादर करता येते आणि मगच तो कलाकार त्याच्या मुलाबाळांच्या पोटाची खळगी भरु शकतो. पण गेल्या पाच ते सहा महिन्यापासुन कोणत्याच प्रकारचे काम नाही ना येथुन पुढे किती दिवस काम मिळणार नाही ..मग मुलाबाळांची पोट कसे भरायचे कश्या पद्धतीने त्यांना जगवायचे असा सवाल रामभाऊ कांबळे यांनी मांडला. तरी संगीत कला क्षेत्रातील सर्व स्थरातील कलाकारांना "आर्थिक सहाय्यता निधी" आमलात आणून कलाकारांना आर्थिक मदत मिळावी असे नमुद केले.
या वेळी सांस्कृतिक आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री रामभाऊ कांबळे त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सत्यभामा आवळे, विजय मोहिते, ओंकार कांबळे, पवन ओव्हाळ, भुपेष देवकर उञेश्वर साठे, दैवत पाटोळे इत्यादी उपस्थित होते.