पुणे: पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत खडक पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार देण्यात आली आहे. हेतू पुर्वक अफवा पसरविल्या आणि चिथावणीखोर विधाने केल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आय) शहराध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी ही तक्रार दिली आहे.
गोस्वामी हेतूपूर्वक अफवा पसरविण्यास आणि चिथावणीखोर विधाने करणे या बाबतीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आय) शहर अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या मार्फत अॅड. तौसीफ शेख यांनी ही तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, गोस्वामी पत्रकारीतेचा गैवापर करून अफवा पसरवत आहेत. त्यांच्याकडून भडकाऊ वक्तव्ये केली जात आहेत. सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला असतानाप्रकरणातील साक्षीदारांना फोन करून त्यांची उलट तपासणी घेत आहे. हे कायद्याविरूध्द असल्याचे सांगत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. भारतात देशांतर्गत शांतता व शांतता भंग करण्याच्या हेतूने, आणि सामाजिक अशांतता निर्माण करणे, देशात मोठ्या प्रमाणात दंगली निर्माण होऊ शकतात अशी शक्यताही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.