विशाल भालेराव
खानापूर परिसरात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच खानापूर मधील लोकांसाठी बेड उपलब्ध होत नाही, वेळेवर उपचार उपलब्ध नाही. वारंवार अशा अनेक समस्या येत आहेत. त्यामुळे खानापूर येथे पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाची २२ गुंठे जागा असून या जागेवरती खानापूर परिसरासाठी स्वतंत्र कोविड सेंटर करण्यात यावे, अशी मागणी सुधाकर गायकवाड यांनी त्रिंबकअण्णा मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
बुधवार रोजी आतिशय दुर्दैवी घटना खानापूर ता. हवेली येथे घडली आहे. गणेश तिकोणे वय वर्ष (४२) तरुणांचा रिपोट करोना पाॅजेटिव्ह आला होता. रिपोट पाॅजेटिव्ह आल्यानंतर पुणे येथे सरकारी बेड उपलब्ध नसल्याने खाजगी दवाखान्यात त्यांना दाखल व्हा असे त्यांना सागण्यात आले. पण घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे पैसै नसल्याने ते घरी निघून आले. बुधवारी सकाळी दहा ते बारा दरम्यान त्यांच्या उपचारा आभावी दुर्दैवी मुत्यु झाला आहे. अश्या अत्यंत दुर्दैवी घटनेची पुरावृत्ती होऊ नये यासाठी खडकवाला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी त्रिंबकआण्णा मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे खानापूर गावासाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करून खानापूर येथे स्वतंत्र कोविड सेंटर उपलब्ध करून देण्यात यावे असे निवेदन देण्यात आले. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन पत्र दिले.
लवकरच खानापूर परिसरात स्वतंत्र असे सर्व सुविधांनी युक्त स्वतंत्र कोविड सेंटर उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खडकवासला विधानसभा ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबकअण्णा मोकाशी, यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन देऊन लवकरात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली. सोनापूर आंबी, रुळे, निगडे, वोसंडे, वरदाडे, मालखेड, खानापूर, खामगाव, डोणजे परिसरातील गावांना या कोविड हॉस्पिटलचा फायदा होणार आहे.
या वेळी गोगलवाडीचे सरपंच अशोक गोगावले आणि सुधाकर गायकवाड युवक अध्यक्ष राष्ट्रवादी खडकवासला मतदार संघ आदी उपस्थित होते.
Covid-Hospital-with-100-beds-with-all facilities-should-be-started-at-Khanapur.