संभाजी महाराज यांच्या जन्मभूमीत आमरण उपोषण.
महाराष्ट्रात गेली 80 वर्षांपासून शिवाजी बिडीचं उत्पादन होत आहे. या शिवाजी बिडीचे नावं बदलण्यासाठी 1975साली आंदोलन झाले. त्यावेळी या बिडीचे नावं बदलून संभाजी बिडी ठेवण्यात आले. संभाजी महाराज यांचे देखील नावं संभाजी बिडीला देऊ नये या मागणी साठी आज संभाजी महाराज यांच्या जन्मभूमी असलेल्या पुरंदर किल्याच्या पायथ्याला शिवधर्म फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
शिवधर्म फाउंडेशन च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचे बिडी ला दिलेले नावं हटवण्यासाठी पुणे, चंद्रपूर, हिंगोली, वसमत, सोलापूर, सातारा, जालना, नाशिक, अहमदनगर, जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आंदोलन आज पासून सुरु झाले आहेत....
संभाजी महाराज यांचे नावं बिडी वरून हटवण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी पुरंदर किल्याच्या पायथ्याला असलेल्या नारायणपेठ गावात शिवधर्म फाउंडेशन चे अध्यक्ष दिपक काटे, आणि सुनील पालवे, रवी पडवळ, सागर पोमण, दिनेश ढगे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे....
संभाजी बिडी हे नावं बदलल्याशिवाय हे उपोषण माघारी घेणार नसल्याची भूमिका उपोषण कर्त्यांनी घेतली आहे.