विशाल भालेराव
खडकवासला. दि. ८, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस म्हणून तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन घोटाकुले यांच्याकडून खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते दिपक मते यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली होती. पण, पक्ष म्हणून काम करीत असताना वैयक्तिक हेवेदावे उफाळून आले. काम करण्याचे किंवा निर्णय घेण्याचे स्वतंत्र मिळाले नाही. याउलट, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस कामात अनेकांनी सोयीस्कर हस्तक्षेप सुरू केला. खडकवासला राष्ट्रवादी मतदार संघातील पक्षात अंतर्गत गटबाजी संपता संपत नव्हती. अखेर दिपक मते यांचा संयम सुटला. आज दिपक मते यांनी तडकाफडकी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा अध्यक्षांकडे करोना प्रादुर्भावामुळे ऑनलाईन मेल द्वारे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे खडकवासला राष्ट्रवादी पक्षामध्ये खळबळ उडाली आहे.
दिपक मते हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी मध्ये कार्यरत आहेत, या अगोदरही त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस खडकवासला विधानसभा मतदार संघ्याच्या सचिव पदी काम केले असून, यापूर्वी ते पुणे जिल्हा युवक काँग्रेस सोशल मिडिया उपाध्यक्ष पदी कार्यरत होते.