अत्यंत दुर्दैवी घटना खानापूर मधील कोरोना पेशंटला बेड न मिळाल्याने घरीच तडफडून मृत्यु; गावक-यांनीच केला अंतविधी


विशाल भालेराव 

सिंहगड टाईम्स- दि. ८ रोजी आतिशय दुर्दैवी घटना खानापूर ता. हवेली येथे घडली आहे. गणेश तिकोणे वय वर्ष (४२) तरुणांचा रिपोट करोना पाॅजेटिव्ह आला होता. रिपोट पाॅजेटिव्ह आल्यानंतर पुणे येथे सरकारी बेड उपलब्ध नसल्याने खाजगी दवाखान्यात त्यांना दाखल व्हा असे त्यांना सागण्यात आले. पण घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे पैसै नसल्याने ते घरी निघून आले. बुधवारी  सकाळी दहा ते बारा दरम्यान त्यांच्या उपचारा आभावी दुर्दैवी मुत्यु झाला आहे. जसा मृत्यू झाला तसे खानापूर गावचे सरपंच, पोलीस पाटील, सातत्याने प्रयत्न करत होते. पंरतु त्यांना गणेश तिकोणेच्या अंतविधीसाठी शासकीय प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही.

पाच ते सहा तास वाट पाहील्यानंतर खानापूरचे संरपच निलेश जावळकर, पोलीस पाटील गणेश सपकाळ, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी अदित्य धारूरकर,ओम तिकोणे यांनी स्वता पी.पी कीट घालून गणेश तिकोणेवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

याप्रकरणामध्ये जिल्हा आधिका-यांनाही संपर्क करण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे सीओ यांनाही संपर्क करण्यात आला होता. पण त्यांनी फोन उचलला नाही तालुका आधिकारी यांना संपर्क करण्यात आला पण पाहीजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. सरपंच, पोलीस पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र खानापूर येथील आधिकारी पुढे आले. या मयत तरूणावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आतिशय,दुर्दैवी घटना खानापूर येथे घडली.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आनेक लोकांनचे जीव जातायेत.खानापूरमध्ये आशी दुर्दैवी घटना पाहण्यास मिळाली. गावक-यांनाच अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. या मयत व्यक्ती गणेश तिकोणे यांचा भाऊ सुध्दा पाॅजेटिव्ह आहे. घरातील इतर लोकांना माहीतीसुध्दा नाही. आपल्या घरातील व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी नेले आहे. यावेळी माझी संरपच लाला जावळकर, ग्रामसेविका वंदना गायकवाड, आशा वर्कर्स साधना यादव, सुजित राऊत उपस्थित होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.