गेल्या तीन चार वर्षांर्पासून पुणे महानगर पालिकेमध्ये वेगळीच परंपरा चालू झाली आहे. प्रत्येक खात्यामध्ये ठेकेदारी पद्धतीने कामगाराची भरती केली असून त्यांना किमान वेतन कायद्यानुसार पगार दिला जात नाही असा खळबळ जनक खुलासा काँग्रेस चे गट नेतेआबा बागुल यांनी केला आहे. महापालिकेच्या वतीने किमान वेतन किमान वेतन कायद्यानुसार टेंडर काढले जातात. त्या प्रमाणे प्रत्येक कामगाराला किमान वेतन कायद्यानुसार १६ ते १७ हजार रुपये प्रति महिना पगार ठेकेदाराकडून देणे आवश्यक असते. परंतु अतिक्रमण विभागाच्या १५० कामगारांना ठेकेदारांकडून १३ तास काम करूनही फक्त ७६०० प्रति महिना पगार दिला जात असून ठेकेदार महापालिकेची लूट करत असून त्याला महापालिका अधिकाऱ्याचा पाठींबा आहे. या प्रकरणी आपण संबधित ठेकेदारावर कारवाई करा अशी मागणी अतिरिक्त आयुक्तांकडे केली आहे अशी माहिती आज कॉंग्रेसचे गट नेते आबा बागुल यांनी म्हटले आहे.
महापालिकेत प्रत्येक खात्यात ठेकेदारी पद्धतीने कामगार भरतीची कुप्रथा पडलेली आहे. हे ठेकेदार कामगारांची आर्थिक पिळवणूक करून गलेलठ्ठ होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा पद्धतीने किमान वेतन कायदा न पाळता, कामगारांचे इएसआय ,पीएफ न भरता त्यांची पिळवणूक जर कोणी करत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही .आज असंख्य कामगार महापालिकेत आले होते. या प्रकरणी आपण संबधित ठेकेदारावर कारवाई करा अशी मागणी कॉंग्रेसचे गट नेते आबा बागुल यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे केली आहे.
महापालिकेच्या वतीने किमान वेतन किमान वेतन कायद्यानुसार टेंडर काढले जातात. प्रस्तावित टेंडर प्रमाणे किमान वेतन किमान वेतन कायदा न पाळता, कामगारांचे इएसआय ,पीएफ न भरता त्यांची पिळवणूक करणाऱ्या करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच त्या ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा टाकता येतो का ते पाहावे, तसेच अजून कोणी काही कामगाराची पिळवणूक होत असेल तर संपर्क करावा असे कॉंग्रेसचे गट नेते आबा बागुल आवाहनही केले.