पुणे शहर व जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने कोरोना बाधित रूग्णांना वेळेत हॉस्पिटल, ऑक्सिजन बेड्स, व्हेंटीलेटर बेड्स उपलब्ध होत नाही. बेड्स उपलब्ध होत नसल्याने अनेकांचे प्राण गेले आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आवश्यक हॉस्पिटलची संख्या कमी आहे. लॉकडाऊन उठल्याने सर्व छोटे मोठे उद्योगधंदे व्यवसाय सुरू झाले आहे. परिणामी औद्योगिक कंपन्या मधील कर्मचारी वर्ग कामानिमित्त बाहेर आल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. मोठ्या इंडस्ट्रीज मधील कर्मचाऱ्यांसाठी कंपनीच्या आवारात स्वतंत्र कोरोना सेंटर उभारण्यासाठी मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या - दिपाली प्रदीप धुमाळ, पुणे मनपा यांनी केली आहे.
प्रत्येक कंपनी मध्ये शेकडो च्या संख्येने कामगार वर्ग आहे.त्यांना हॉस्पिटल व उपचार वेळेत न मिळाल्याने अनेक कर्मचार्याना आपले जिव गमवावे लागले आहे. हा धोका जर कमी करावयाचा असेल तर काही ठराविक कर्मचारी असलेल्या कंपनीने आपल्या कोरोना बाधित कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी आपल्या कंपनीच्ये आवारातच विलगीकरण कक्ष, कोविड सेंटर, ऑक्सिजन बेड्स व व्हेंटीलेटर बेड्स असलेले व आवश्यक असलेला स्टाफ डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशन व हॉस्पिटल साठी लागणारा कर्मचारी वर्ग अशा सुस्थितीत तात्पुरते हॉस्पिटल सुरू करावीत जेणेकरून कंपनीमधील कोरोना बाधित कर्मचारी वर्गावर त्वरीत उपचार होतील. काही कंपन्यांची अशा प्रकारे विलगीकरण कक्ष, कोविड सेंटर, तात्पुरते रुग्णालय उभारण्याची तयारी देखील आहे .अशा प्रकारे ज्या कंपन्या हॉस्पिटलची व्यवस्था करतील अशा कंपनीना केंद्र शासन, राज्य शासन किंवा महानगरपालिका यांचे स्तरावरून विशेष सवलत व मदत करावी.