सुनिल कदम यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार


विशाल भालेराव

सिंहगड टाईम्स-खानापूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक  सुनिल अर्जुन कदम यांना शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल  पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी आणि पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने "आदर्श  मुख्याध्यापक " पुरस्कार संघटनेचे प्रमुख जी.के.थोरात यांनी जाहीर केला.

 संघटनेचे खडकवासला विभागाचे अध्यक्ष सुरेश शेंडकर, संघटक ठवाळ सर, गाजरे सर यांचे हस्ते कदम यांना पुरस्काराचे पत्र दिले. यावेळी पुणे जिल्हा प्रमुख सचिन दुर्गाडे, विभीषण पवार तसेच  विद्यालयाचे पर्यवेक्षक म्हाळसाकांत खेडेकर यांनी विद्यालयातर्फे अभिनंदन केले. आभार विपुल व्हावळ यांनी मानले. यावेळी शिक्षक-शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थ्यांनी कदम यांना पुरस्कार मिळाल्याबद्दव अभिनंदन केले.


Ideal Headmaster Award to Sunil Kadam


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.