राष्ट्रवादी कोविड ब्रिगेडच्या वतीने वडगाव शेरी येथे नागरिकांसाठी कोविड हेल्पडेस्कचे उदघाटन

 




कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आग्रही पुढाकार घेतला आहे.शरद पवारांच्या  व खासदार सुप्रियाताई सुळे, खा. वंदनाताई चव्हान, आ. चेतनदादा तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली आज खडकवासला मतदार संघात  NCP COVID Help Desk सहाय्यता कक्ष उभारण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणूनकोव्हिड ब्रिगेड मदत कक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात नगरसेवक महेंद्र पठारे यांच्या संपर्क कार्यालयात  मा. रविंद्रआण्णा माळवदकर (अध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व निरिक्षक वडगाव शेरी विधानसभा मतदार संघ) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नागरिकांना COVID संदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी  NCP COVID Brigade च्या वतीने Help Line Desk Center (सहायता कक्ष) चालू करण्यात आला आहे.  

या अंतर्गत कार्य करण्यासाठी विधानसभानिहाय राष्ट्रवादी ब्रिगेड तातडीने तयार करण्यात येणार अली असून त्यामार्फत राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने सिंहगड रोडला वडगाव ब्रिज चौक येथे नागरिकांसाठी एनसीपी पुणे सिटी कोविड हेल्पडेस्क सुरू करण्यात आले असून यामार्फत कोविड हॉस्पिटलची अद्यावत माहिती, टेस्टिंगच्या सोयी, अ‍ॅम्ब्युलन्स, समुपदेशन केंद्र, इतर वैद्यकीय सोयी आदींची माहिती देण्याची सोय करून देण्यात अली आहे. 

या वेळी मतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र खांदवे, नगरसेवक महेंद्र पठारे , नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, नगरसेविका सुमनताई पठारे, संतोष राजगुरु, डाॅक्टर गायकवाड आदी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.