पुण्यातील कोविड-19 रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्यात ऑक्सिजनची कमतरता देखील जाणवते आहे. नागरिकांना तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहोत. याचाच एक भाग म्हणून हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी हडपसर माळवाडीतील मेडिकेअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने १४ नवीन ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले आहेत. काल गुरुवारी रोजी ऑक्सिजन बेडचे लोकार्पण करण्यात आले.
हडपसर भागातील जनतेला कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी उत्तम वैद्यकीय सुविधा मिळावी, तातडीने ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावे यासाठी आमदार तुपे हडपसर परिसरातील रुग्णालयांना आवश्यक त्या सर्व सुविधा मिळतील यासाठी प्रयत्नशील आहेत.
ऑक्सिजन सिलेंडर्स कमी पडू नये म्हणून हडपसरकरिता स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूकही त्यांनी करून दिली आहे. या संकटाच्या काळात हडपसरवासीयांच्या सोयीसाठी हॉस्पिटल उपलब्ध करून दिले त्याबद्दल मेडिकेअर हॉस्पिटल आणि डॉ. गणेश राख यांचेही आभार मानण्यात आले. यावेळी स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे आणि दत्तात्रय तुपे, हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे, मेडिकेअर हाँसपिटलचे डॉ. गणेश राख, डॉ. लालासाहेब गायकवाड, डॉ. शिवदीप उंद्रे, डॉ. विराज सोनवणे, डॉ. अशोक बनसोडे, डॉ. सत्यवान आटपाडकर, डॉ. अमोल पतिंगे, डॉ. विजय जोशी, तुषार बिनवडे, विजय तुपे, हमीद सय्यद आदी उपस्थित होते.