महापौर मुरलीधर मोहळ यांनी प्लाझ्मा दानसाठी दिले रक्ताचे नमुने


पुणे, (सिंहगड टाईम्स) कोरोनाबाधित रुग्णांचा आपल्या पुणे शहरातील मृत्युदर २.४० टक्के इतका असून हे प्रमाण आपल्याला अजून खाली आणायचे आहे. त्यासाठी शहरामधील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुढे यावे. यासाठी महापौर मुरलीधर मोहळ यांनी स्वतः  प्लाझ्मा दानसाठी रक्ताचे नमुने दिले असून प्लाझ्मा दानसाठी पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले, यासाठी लवकरच प्लाझ्मा दानासाठी मोहीम राबवत आहोत.


पुणे महापालिकेच्या कोरोनामुक्त झालेल्या २१० व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पात्र असून पुणे शहराचा पहिला नागरिक या नात्याने यात पहिला नमुना मुरलीधर मोहळ यांनी दिला. आतापार्यंत ७५० कोरोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मा दान करण्याकरिता पुढे आल्या आहेत. शहरात जवळपास ८० हजार कोरोनामुक्त असून प्लाझ्मा दान करण्यासाठी जास्तीत जास्त जणांनी पुढे यायला हवे. शहराचा मृत्युदर २.४०% इतका असून हा दर बऱ्याच प्रमाणात खाली आणायचा आहे. त्याकरिता प्लाझ्मा दान ही संकल्पना व्यापक करण्यात पुणे महानगर पालिकेच्या वतीने लवकरच विशेष मोहीम राबवनयेत येणार असल्याचे महापौरांनी सांगितले


या वेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक आदित्य माळवे, सुशील मेंगडे, अविनाश बागवे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हकारे, डॉ. नलिनी काहगी, ससून रक्तपेढी विभागप्रमुख, डॉ. शंकर मुगावे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.