माझे कुटुंब , माझी जबाबदारी " ही मोहीम मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात आज दिनांक 15 सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत आरोग्य कर्मचारी आणि महापालिका सेवक घरोघरी जाऊन सर्वांची आरोग्य माहिती व तपासणी करणार आहेत या मोहिमेची सुरवात आज पासून केली आहे तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व आपल्या घरी येणाऱ्या महापालिका सेवक आणि कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन नगरसेवक विशाल धनवडे यांनी केले.
त्याच पार्श्वभूमीवर नगरसेवक विशाल धनवडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही शासनाची मोहीम संपूर्ण राज्यासह पुणे महानगर पालिकापरिसरात राबवण्यात येणार आहे. धनवडे नागरिकांना आव्हान करताना सांगितले की, आपण स्वतः आपले व कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, जेणे करून आपल्याला व आपल्या कुटुंबाला कोरोना ची बाधा होणार नाही, अशी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तोंडाला मास लावणे, सोशल डिस्टन्सच्या नियमांचे काटेकोर पालन करणे, हात वारंवार सॅनिटायझ करणे अशी काळजी आपण घेतली पाहिजे. किमान आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली तर आपण नक्कीच आपले गाव, शहर तसेच जिल्हा कोरोना मुक्त होण्यासाठी हातभार लागेल.
कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात आज पासून राबविण्यात येणारी ‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी, या मोहिमेत टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. येणाऱ्या काळात तो आणखी वाढण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केली. पुनश्च हरीओम अर्थात मिशन बिगिन अगेनला पुन्हा सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यासाठी त्यांनी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिम राबवण्याबाबत सांगितलं. १५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत ही मोहिम राबवली जाणार आहे.