विशाल भालेराव
कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आग्रही पुढाकार घेतला आहे.शरद पवारांच्या व खासदार सुप्रियाताई सुळे, खा. वंदनाताई चव्हान, आ. चेतनदादा तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली आज खडकवासला मतदार संघात NCP COVID Help Desk सहाय्यता कक्ष उभारण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून खडकवासला मतदार संघातील वडगाव ब्रिज चौक येथे नागरिकांना COVID संदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी NCP COVID Brigade च्या वतीने Help Line Desk Center (सहायता कक्ष) चालू करण्यात आला असून याचे आज रोजी उद्धघाटन प्रदेशाध्यक्षा- रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते झाले.
या अंतर्गत कार्य करण्यासाठी विधानसभानिहाय राष्ट्रवादी ब्रिगेड तातडीने तयार करण्यात येणार अली असून त्यामार्फत राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने सिंहगड रोडला वडगाव ब्रिज चौक येथे नागरिकांसाठी एनसीपी पुणे सिटी कोविड हेल्पडेस्क सुरू करण्यात आले असून यामार्फत कोविड हॉस्पिटलची अद्यावत माहिती, टेस्टिंगच्या सोयी, अॅम्ब्युलन्स, समुपदेशन केंद्र, इतर वैद्यकीय सोयी आदींची माहिती देण्याची सोय करून देण्यात अली आहे.
यावेळी नगरसेवक सचिन दोडके, बाबा धुमाळ, खडकवासला राष्ट्रवादीचे अध्यक्ष - काकासाहेब चव्हाण, त्रिंबकआण्णा मोकाशी,सुरेखाताई दमिष्टे,अश्विनीताई खाडे पाटील,भावना खेतानी व पदाधिकारी उपस्थित होते.