ना घोडा ना गाडी ना आहेर, कमी वेळेत शुभ मंगल सावधान
विशाल भालेराव
पानशेत दि.२- चार पाच महिन्यापासून कोरोनाने सगळीकडेच थैमान घातले आहे.त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमासह आदि कार्यक्रमावर काही महिन्यापासून बंदी आहे.त्यामुळे कमी व्यक्तीच्या उपस्थित लग्न होत असल्यामुळे आनेक मुला-मुलींच्या आई-वडिलांना कमी खर्चात लग्न झाल्याने खुप समाधान वाटत आहे.कोरोनामुळे लग्नाला होणारा खर्च बचत होऊ लागला आहे.
कोरोना महामारीमुळे नवरा-नवरीच्या आई वडिलांना वर माय-वर बाप यांच्या डोक्यावरील लग्नाच्या खर्चाचा प्रश्न जवळपास संपुष्टात आला आहे .ग्रामीण भागामध्ये बहुतांश जण मोलमजुरी करून जीवन जगतात.त्यामध्ये मुला-मुलींचे लग्न म्हटलं की त्यांना राञभर झोप लागत नाही .लग्न कस करायच पैसै कुठुन आणायचे हा प्रश्न त्यांना नेहमी सतावत आसतो .पैसै नसेल तर बॅंकेचे कर्ज काढायचे की सावकाराकडून घ्यायचे किव्हा मिञ परिवार, नातेवाईक यांच्याकडून उसनवारी घ्यायचे कशी तरी पैशाची जुळवणी करून लग्न पार पाडायच त्यानंतर दोन तीन वर्ष कर्ज फेडायच या सर्व चक्रातून अनेक माता-पित्यांची सुटका झाली आहे.आता दोन तासामध्ये लग्न उरकून रिकामे होत आहेत.
पुर्वी लग्नामध्ये चहा व तेलाच्या पुरी देऊन लग्न पार पडत होते. चहा वरती लग्न केलेले आजून नागरिक सांगत आहेत. लग्नात होणारा खर्च म्हणजे दहा वर्षाची अधोगती सध्या कोरोनामुळे लग्नासाठी पुर्वीचे दिवस आले आहेत. कमी खर्चात कमी वेळेत लग्न होत आहेत. - जिजाबाई दिवार ,खानापूर
दरवर्षी लग्नासराईत फोटोसाठी आॅर्डर मिळायच्या काही ठिकाणी फोटोग्राफर मिळत नव्हते. करोनामुळे काही प्रमाणातच लग्नाची आॅर्डर मिळत आहे. त्यामुळे फोटो व्यवसाय आडचणीत आला आहे.- दत्ता भोकरे ,फोटोग्राफर खानापूर
वडिलापासून मंडप डेकोरेटरचा आमचा व्यवसाय आहे लग्नसराईत आम्हाला फुरसत मिळत नसे. परंतु या वर्षी काही प्रमाणातच भाडे मिळेले आहे. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.- ईश्वर शेलार, मंडप डेकोरेशन