पुण्यात १७ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार आहे. मुंबईत २० सप्टेंबर रोजी ठिकठिकाणी ठिय्या आंदोलनाची तयारी सुरू आहे. तसेच २१ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाचे कारण पुढे करुन मराठा समाजाला आंदोलन करू नका असे आवाहन केले होते. मात्र आंदोलनाच्या मुद्यावर मराठा समाज ठाम आहे. मराठा क्रांती मोर्चा या संघटनेने १७ सप्टेंबरपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन नव्याने सुरू होत असल्याचे जाहीर केले.
पुण्यात आंदोलनकर्त्यांना नोटीस
विशेष म्हणजे, मराठा आरक्षण आंदोलन १७ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार आहे उद्या (दि. १७ सप्टेंबर) होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलीस प्रशासनाने हवेली पोलीस स्टेशन मार्फत मराठा क्रांती मोर्चाच्या अश्विनी खाडे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पुणे शहरात करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून राज्य सरकार व पुणे महानगर पालिका तसेच पुणे शहर आयुक्तालयाच्या कार्य क्षेत्रामध्ये खाजगी व सार्वजनिक क्षेत्रामध्ये गर्दी करण्यास करण्यात अली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शाशन व पुणे महानगर पालिका तसेच पोलीस सहआयुक्त पुणे शहर यांनी ठरवलेल्या अति व शर्तीचे पालन न झाल्यास आपल्यावर उचित कारवाई केली जाऊ शकते असे या नोटीशीमध्ये नमूद केले गेले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे २०२०-२१ या वर्षात सरकारी नोकर भरती आणि शैक्षणिक प्रवेशात कुठेही मराठा आरक्षण लागू होणार नाही. कोरोना संकटामुळे अडचणीत सापडलेल्या मराठा समाजासाठी आरक्षण स्थगित होणे हा सर्वात मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयिका अश्विनी खाडे दिली.
या पार्श्वभूमीवर सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, उपायुक्त, सहायक आयुक्त व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी त्यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील गोपनीय यंत्रणा सतर्क करण्यात येऊन मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. तसेच मंत्र्यांच्या दौर्याच्या वेळी वरिष्ठ अधिकार्यांच्या देखरेखी खाली पुरेसा बंदोबस्त लावण्यात यावा. तसेच योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येऊन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असे आदेश राज्यभरातील पोलिसांना देण्यात आले आहेत.
आंदोलन झाल्यास कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती
महाराष्ट्रात २ लाख ९१ हजार ७९७ कोरोना रुग्णांवर (कोरोना अक्टिव्ह पेशंट) उपचार सुरू आहेत. राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यात २० हजार ४८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना संकटाची तीव्रता वाढत आहे. अशा परिस्थितीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाल्यास कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती राज्य सरकार व्यक्त करत आहे.