पुण्यात रक्तदान करून मराठा आरक्षण स्थगितीचा निषेध आणि सोबतच मराठा समाजाचा गंभीर इशाराही

पुण्यात रक्तदान करून मराठा आरक्षण स्थगितीला विरोध आणि सोबतच मराठा समाजाचा गंभीर इशाराही


मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात तात्पुरती स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यभरात मराठा संघटनांनी आंदोलनं पुकारली आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा बांधवांना आंदोलन न करण्याचं आवाहन केलं आहे. पुण्यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे व सकल मराठा समाज घोरपडी गाव यांच्या वतीने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे घोरपडी गाव येथे रक्तदान करून वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविला सदर कार्यक्रमासाठी सकल मराठा समाजाच्या शिलेदारांनी २५५  बॉटल रक्तदान करून योगदान दिले यावेळी पुणे अखिल भारतीय यु मराठा महासंघाचे अध्यक्ष युवराज दिसले, कार्याध्यक्ष राकेश गायकवाड, दिपक झेंडे, अविनाश ताकवले, नंदिनी ताई मुरूकुटे इ मान्यवर उपस्थित होते 

मराठा समाज हा शिवरायांच्या विचारांचा वारसदार आहे त्याला अनुसरून आम्ही रक्तदान करून मराठा आरक्षण स्थगितीला विरोध करत असून जेणेकरून सरकारचे लक्ष्य वेधले जावे. राज्य सरकारने आरक्षणावर लवकर निर्णय घ्यावा, समाजाला न्याय द्यावा; अन्यथा मराठा समाज जसे रक्तदानाचे विधायक काम करून निषेध व्यक्त कसू शकतो तसे मराठा आरक्षणासाठी आमचे रक्तही सांडू शकतो असा गंभीर इशारा या वेळी अखिल भारतीय युवा मराठा महासंघाचे अध्यक्ष युवराज दिसले यांनी दिला. 

यावेळी मराठा शिलेदार श्री संकेत अप्पा कवडे ,श्री सुरेश निगडे ,श्री चंद्रकांत कवडे ,श्री नितीन सुरेश निगडे ,श्री रमेश,अशोक क्षिरसागर , संगिता पाटील , संगिता गिरमकर, सुलोचना निगडे,श्री अतिश,चंद्रकांत काळे ,मा नगरसेवक श्री,प्रशांत (अण्णा)मस्के ,श्री माधवराव मोघे ,श्री प्रशांत पहिलवान ,श्री दीपक फडतरे ,श्री प्रकाश कदम ,श्री आल्हाद चव्हाण ,श्री विनोद सकट ,श्री जगदीश कवडे ,श्री अक्षय मुरकुटे ,श्री संदीप साळुंके ,श्री मंगेश क्षिरसागर ,श्री बाळासाहेब गोडसे ,श्री व्यंकटेश वाकुरे श्री मनोज साळुंके .श्री युवराज भगत ,श्री संदीप डुमरे सर,श्री सीताराम नांदुरे ,श्री माधव शिंदे ,श्री कुमार पाटील ,श्री गणेश पाटील ,श्री चेतन कवडे ,श्री महेश वटारे ,श्री अनिल गायकवाड ,श्री सुधीर वटारे ,श्री सुनील गवळी ,श्री देवा शिंदे ,श्री रोहित गवळी ,श्री पार्थ कवडे ,श्री विश्वनाथ गोडसे ,श्री अनिल गाटेआदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

पुण्यात रक्तदान करून मराठा आरक्षण स्थगितीला विरोध आणि सोबतच मराठा समाजाचा गंभीर इशाराही

पुण्यात रक्तदान करून मराठा आरक्षण स्थगितीला विरोध आणि सोबतच मराठा समाजाचा गंभीर इशाराही


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.