प्रधानमंत्री पथविक्रेता 'आत्मनिर्भर निधी' अंतर्गत फेरीवाल्यांना मिळणार 'धनलाभ'


सिंहगड रोड: करोनामुळे मोठ्या उद्योगांसोबतच छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनादेखील फटका बसला असून, या लहान विक्रेत्यांना स्वत:च्या पायावर पुन्हा उभे करण्यासाठी केंद्र शासनाच्या 'प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी' योजना जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत पुणे महापालिका क्षेत्रात १७ हजार लहान मोठ्या लाभार्थ्यांनाही प्रत्येकी १० हजार रुपये कर्ज व्यवसाय उभारणीसाठी दिले जाणार असून, महापालिकेने त्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा परिणाम देशातील करोडो लहान मोठ्या व्यावसायिकांना झाला असून आणि अनेक प्रकारच्या अडचणींना त्यांना. यामध्ये छोटे व्यावसायिक जे त्यांच्या छोट्या व्यवसायातून आपली उपजीविका चालवीत असतात त्याला बर्‍याच त्रास सहन करावा लागत आहे. छोट्या व्यावसायिकांच्या या अडचणी लक्षात घेता केंद्र सरकारने प्रधानमंत्री पथविक्रेता 'आत्मनिर्भर निधी' ही योजना सुरू केली असून. त्यांतर्गत पुणे महानगर पालिका हद्दीतील परवानाधारक पथविक्रेत्यांसाठी दहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत असून त्याद्वारे त्यांना पुन्हा आपला व्यवसाय वाढवून या अडचणीवर मात करणे शक्य होणार असून यासाठीची महापालिकेने त्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

या योजनेचा लाभ केवळ अधिकृत परवानाधारक पथविक्रेत्याना घेता येणार असून योजनेसाठी आधारकार्ड आणि पॅन कार्ड लिंक असलेले राष्ट्रीकृत बँकेतील खाते, पथारी प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड,रेशन कार्ड इत्यादी कागपत्रांची आवश्यकता असून. यामध्ये वार्षिक सात टक्के दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार वेळेवर कर्ज फेडणाऱ्यांना व्याजातून मुक्ती दिली जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने https://pmsvanidhi.mohua.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज दाखल करता येणार आहे. करोनामुळे लॉकडाउनचा फटका सर्वच व्यावसायिकांना बसला असून, आर्थिक मंदीने सर्वांचेच व्यवयास डब्यात गेले आहेत. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या पथविक्रेत्यांना सरकारकडून वार्षिक ७ टक्के दराने १० हजार रुपये त्वरित कर्ज उपलब्ध होणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत 'पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर योजन'अंतर्गत नोंदणीकृत अथवा नोंदणी न झालेल्या सर्व छोट्या उद्योजकांना अल्पदरात १० हजार रुपये कर्ज त्वरित उपलब्ध होणार आहे. भाजीविक्रेता, टपरीधारक, फुलविक्रेता, छोटे दुकानदार, पानटपरी, चर्मकार तसेच हातगाड्यावरून व्यवसाय करणाऱ्यांना यातून कर्ज मिळणार आहे. 

सिंहगड रोड वडगाव बुद्रुक – धायारीचे नगरसेवक हरिदास चरवड यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या सोईसाठी मोफत अर्ज भरणे आणि मार्गदर्शनाची सोय केली असून याचा लाभ अधिकृत परवानाधारक पथविक्रेत्यांनी घ्यावा असे आवाहन नगरसेवक चरवड यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.