पुणे : राज्यातील मंदिर उघडण्याच्या मागणी बाबत भाजप सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. १ सप्टेंबरला मंदिरं खुली करावीत. अशी मागणी करत भाजपच्या वतीने महाराष्ट्रभर घंटानाद आंदोलन करण्यात आले, परंतु पुणे महानगर पालिकेत भाजपची सत्ता असतानाही या वर्षी श्री गणेशाचे विसर्जन घरीच करा असे आदेश काढण्यात आले होते.
एकीकडे पुणे महानगरपालीकेमार्फत सांगितले गेले की या वर्षी श्री गणेशाचे विसर्जन घरीच करा आणि महानगरपालीकेच्या वतीने प्रत्येक सोसायटित गाडी पाठवुन गणेश विसर्जन केले मग एकीकडे तुम्ही मंदिर खुली करा कसे सांगता, ही दुटप्पी भूमिका नाही का ? असा जळजळीत सवाल अश्विनी खाडे माजी युवती अध्याक्षा राष्ट्रवादी पुणे यांनी केला आहे
महापालिकेत भाजपची सत्ता असूनही भाजप धार्मिक राजकारण करत आहेत. मंदिराची पूजा अर्चा नियमात होत असेल तर मंदिर खुली करण्याचा अट्टाहास का ? असे म्हणत खाडे यांनी भाजपच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
जनतेची काळजी नाही मंदिर खुली करून कोरोना सारख्या अजाराचे प्रमाण वाढु शकते . यात मंदिराची दान पेटी भरून ट्रस्ट मोठ करायची आहे का ? असा सवाल देखील अश्विनी खाडे यांनी यावेळी विचारला आहे.