पुणे महानगर पालिकेचा जन्म व मृत्यु दाखल्यांच्या नोंदीबाबत नियोजनशुन्य कारभार; दिपाली प्रदिप धुमाळ

 

पुणे महानगर पालिकेचा जन्म व मृत्यु दाखल्यांच्या नोंदीबाबत नियोजनशुन्य कारभार; दिपाली प्रदिप धुमाळ

पुणे महानगरपालिकेचे जन्म व मृत्यू दाखले देणे व नोंद ठेवणे यासाठी आरोग्य विभाग अंतर्गत स्वतंत्र जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालय आहे. मनपाकडून नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले मिळतात. माहे मार्च २०२० कोरोना पासून जन्म व मृत्यू दाखले नागरिकांना वेळेत मिळत नाही असे निदर्शनास येत आहे. यावर माहिती घेतली असता प्रशासकीय कामकाजासाठी सेवक वर्ग नाही अशी माहिती सांगितली जात आहे. परिणामी नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले मिळत नाही. मृत्यू होऊन ६ महिने उलटले तरी मनपाकडे याबाबत नोंद नाही म्हणून नागरिक कार्यालयात गर्दी करतात परंतु त्यांचे निराकरण न करता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. वास्तविक जन्म व मृत्यू यांच्या नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र कार्यालय संगणकीय यंत्रणा उपलब्ध करून दिलेला आहे.

प्रशासनाच्या बेजवाबदार काम, वेळेत काम पूर्ण न करणे यामुळे जन्म व मृत्यू कार्यालयात रांगा लागत आहे. तरी जन्म व मृत्यु नोंदणी विभाग प्रमुख व संबंधित काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेत न काम केल्याने त्याची योग्य ती माहिती घेवून आवश्यकता वाटल्यास कर्तव्य कसूर केल्याबाबत कार्यवाही करण्यांत यावी.  

ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांनी जन्म-मृत्युची घटना घडल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, कॅन्टोमेंट बोर्ड/महानगरपालिका इ. ठिकाणी जन्म-मृत्युची माहिती घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत दिली पाहिजे.

वरील मुदतीच्या आत जन्म-मृत्युची नोंद व माहिती वेळेवर देणे कायद्याने सक्तीचे आहे. वरील मुदतीत नोंद करून लगेच दाखला मागितल्यास तो मोफत मिळतो. मुदतीत नोंद केली परंतु दाखला घेतला नसल्यास तो मिळविण्याकरता शासनाच्या नियमाप्रमाणे पैसे पडतात. जन्म अथवा मृत्यूचा दाखला नियमाप्रमाणे पैसे भरून पोस्टाने मागविता येतो. जन्म मृत्युची नोंद मुदतीत न केल्यास विलंब शुल्क पडते. म्हणूनच जन्ममृत्यूची नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे.



Unplanned-management-of-birth-and-death-certificates-of-Pune-Municipal-Corporation-Deepali Pradip-Dhumal

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.