हडपसर: महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने विविध भाजप कडून शुक्रवारी शहरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेवाळवाडी परिसरात ग्राम स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. भाजप पक्षाचे जिल्हा उपाधध्यक्ष राहुल शेवाळे यांनी या स्वच्छता मोहिमेचे अजोजन केले होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेत शेवाळवाडी परिसरात भाजप पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली हातामध्ये झाडू घेऊन अनेक भाजप कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. या स्वच्छता मोहिमेस ग्रामस्थांनी दिलेल्या प्रतिसादामुळे संपूर्ण गावाचं चकाचक झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वच्छतेचा संदेश दिला आहे. म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेवाळवाडी परिसरात ‘स्वच्छता मोहीम’ हाती घेत असल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले.
या मोहिमे अंतर्गत शेवाळवाडी परिसरात सर्व रस्त्यांची साफसफाई करण्यात अली असून सर्वत्र जंतू नाशक औषधांची फवारणी करण्यात आली. गरजू व्यक्तीनां वाफेच्या मशीनचे, सॅनिटायझर मास्क आदींचे वाटप करण्यात आले. राहुल शेवाळे यांनी राबवलेल्या उपक्रमाचे शेवाळवाडीतून कौतुक केले असून अनेकांनी आभार मानले. या वेळी नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी या मध्ये सहभाग नोंदविला.
या वेळी पक्षाचे संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडारे उपस्थित होते. भाजपच्या वतीने राबवण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेचे दिनेश भंडारी, राजाभाऊ खेडेकर, वैभव शेवाळे, संदीप हरपळे, तालुका अध्यक्ष- धनंजय कामठे, सचिन हांडे, पप्पू जाधव, पांडुरंग रोडे, सुजितसिंग परदेशी, सुरज बिरे, संदीप परदेशी, कीर्ती हिंगे, महेश भांडळे, अलंकार खेडेकर,आदींनी या मोहिमेचे संयोजन केले होते.