भ्रष्टाचाराला पायबंद घाला अन्यथा राष्ट्रवादी युवक रस्त्यावर उतरून आंदोलन करू .... विशाल वाकडकर

भ्रष्टाचाराला पायबंद घाला अन्यथा राष्ट्रवादी युवक रस्त्यावर उतरून आंदोलन करू .... विशाल वाकडकर


कोविड काळात रुग्ण दाखल नसतानाही स्पर्श हॉस्पिटलने मनपाकडे बिले सादर केली आहेत हे सर्व संशयास्पद

कोविड काळात रुग्ण दाखल नसतानाही स्पर्श हॉस्पिटलने मनपाकडे बिले सादर केली आहेत हे सर्व संशयास्पद असून त्यांना बिल अदा करु नये अशा प्रमाणे इतर रुग्णालयांनी तसेच खाजगी कोविड सेंटरने जर बिले सादर केली असतील तर ती देऊ नयेत. तसेच यापूर्वी किती आणि कोणत्या खाजगी कोविड सेंटरला बिले अदा केली आहेत त्या तपशील द्यावा व असलेल्या भष्ट्राचाराबाबत त्वरीत कारवाई होण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. 

मार्च २०२० पासून शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाला त्याला प्रतिबंध करण्यासाठी मनपा प्रशासनाने विविध उपाय योजना युध्दस्तरावर चालू केल्या. यामध्ये मास्क  सँनिटाझर इत्यादीच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झालेला आहे. त्याच प्रमाणे मनपामार्फत शहरात विविध ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यात आली होती. त्यांची बिलेही एकही रुग्ण नसताना देण्याचे घाटत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गांच्या प्रतिबंधासाठी सी.एस. आर. अंतर्गंत विविध खाजगी कंपन्यांनीही मनपास मदत केली. परंतु त्यांनी किती मदत केली, कश्या स्वरुपात केली याचा हिशोब अद्याप लागत नाही. तसेच  मागील चार वर्षापासून थेरगाव बापुजीनगर येथील २०० खाटांच्या रुग्णालयाचे काम अद्यापही अर्धवट आहे याची कारणा सविस्तरपणे देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून करण्यात आली. 

शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यत कोरोना विषाणू प्रतिबंध करण्यासाठी मनपाने किती रक्कम कश्या प्रकारे खर्च केली याबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी. त्याच प्रमाणे सी.एस.आर. मधून खाजगी कंपन्यांनी मनपास किती मदत कश्या प्रकारे केली याचीही सविस्तर माहिती देण्यात यावी. अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉग्रेस मार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असे विशाल वाकडकर म्हणाले  यावेळेस राज़ुभाऊ बनसोडे नगरसेवक, विशाल बाळासाहेब काळभोर  प्रदेश सरचिटणीस रा.यु. काँग्रेस महाराष्ट्र, करण कोकणे अध्यक्ष विद्यार्थी रा.काँग्रेस पुणे ज़िल्हा उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.