कृष्णा चारिटेबल पॅथॉलॉजी लॅबचे आज वडगाव बुद्रुक पुणे येथे उद्घाटन
सिंहगड रोड: राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष, शिव मल्हार ब्रिगेडे महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष संजय दादा पाटील, यांच्या संकल्पनेतून सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना याचा लाभ होण्याकरिता कोरोना सारखा महाभयंकर आजारामध्ये समाजातील सर्व लोकांचे हाल झाले, व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लोकांना मदत होण्याकरिता, शरदचंद्र सेवाभावी संस्था संचलित कृष्णा चारिटेबल पॅथॉलॉजी लॅबचे आज वडगाव बुद्रुक पुणे येथे उद्घाटन करण्यात आले. या लॅबच्या माध्यमातून लोकांना आर्थिक मदत होणार आहे, त्याचबरोबर 50 टक्के सूट, ना नफा ना तोटा, या तत्त्वावर आरोग्य सेवा देण्याचे संकल्प केला आहे .
या वेळी पुण्यातील कोथरूड येथील डॉ. प्रज्ञा गवंडे, डॉ. बाळकृष्ण गायकवाड, त्वचारोग तज्ञ डॉ. ढमाले, डॉ. संजय शेटे. व डिपारमेंट चे अधिकारी अपर उपआयुक्त, श्री सुशील इंगळे, सहा. आयुक्त, श्री अरुण घोरपडे, पोलीस निरीक्षक,श्री रोहिदास गवारी, सहा.पोलीस निरीक्षक, श्री सागर डापसे, पोलीस उपनिरीक्षक,श्रीमती शुभांगी सातपुते. त्याचबरोबर शुभम सातपुते, अजय महानवर, शिवमल्हार ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष यशराज पाटील, नंदनवन ग्रुपचे डायरेक्टर अश्विनी ताई पाटील, सुहास पाटील, सोमनाथ पाटील, किरण पाटील, साहेबराव शिंदे, तसेच शिव मल्हार ब्रिगेडचे पदाधिकारी युवा नेतृत्व रवी भाऊ जाधव, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस वैभव खंडाळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष करण हजारे, पश्चिम महाराष्ट्र चिटणीस अक्षय पाटील, सांगोला तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Inauguration of Krishna Charitable Pathology Lab at Wadgaon Budruk