नर्हे परिसरातील लोकांच्या सेवेसाठी भूपेंद्र मोरे यांच्या पुढाकाराने नर्हे येथे महा-ई सेवा केंद्र नव्याने सुरू करण्यात आले आहे. या महा-ई सेवाकेंद्राचे उद्घाटन आधार मल्टीस्पेशेलीटी हॅास्पिटलच्या अनाथालयातील ५ आजी व प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी पुणे शहराध्यक्षा स्वाती पोकळे, ग्रामीण अध्यक्ष मा.त्रिंबक आण्णा मोकाशी खडकवासला विधानसभा अध्यक्ष काकासाहेब चव्हाण माजी सभापती सौ.प्रभावती भुमकर आधार हॅास्पिटलचे डॅा. शिंदे यांचेहस्ते झाले या वेळी विभागातील नागरिक उपस्थित होते.
या वेळी भूपेंद्र मोरे म्हणाले की महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रमाणपत्रे, परवाने, अनुज्ञप्ती आणि इतर सेवा प्रदान केल्या जात आहेत. केंद्रचालक नागरिकाला आवश्यक असणाऱ्या सेवेचा अर्ज ऑनलाईन भरून देतो आणि नागरिक आवश्यक त्या सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय प्राप्त करू शकतात. या केंद्राच्या माध्यमातून ७/१२ चा उतारा, रहिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र अशी अनेक उपयुक्त कागदपत्रे नागरिकांना प्राप्त करता येतील. त्यामुळे आता यासाठी त्यांना लांबच लांब रांगा लावायची गरज नाही आणि प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कार्यालयात असंख्य फेऱ्याही माराव्या लागत नाहीत. ही संपूर्ण प्रक्रिया वेळेचीही बचत करते.
सातबाराचा उतारा, नवे रेशनकार्ड, जन्म-मृत्यूचा दाखला तसेच उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, डोमिसाइल सर्टिफिकेट, सर्व प्रातिज्ञापत्रांसह ज्येष्ठ नागरिक दाखला ही कागदपत्रे आता नर्हे येथे मिळणार आहेत. या दाखल्यांच्या अनुषंगाने आवश्यक असलेले महा-ई-सेवा केंद्र मानसी विश्वास हाईट्स नर्हे रोड येथे सुरू करण्यात आले आहे.