संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेचा विस्तार, प्रचार व प्रसार होण्याकरिता हि महत्वपूर्ण जबाबदारी महामुनी यांच्यावर सोपविण्यात आल्याचे अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले.
संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी माझ्यावर दिलेली जबाबदारी हि महाराष्ट्रभर असंघटित असलेल्या डिजिटल मीडियातील संपादक, पत्रकार आणि सर्व संबंधितांना एकत्र घेऊन येण्याची मोठी जबाबदारी आहे. डिजिटल माध्यमांची वाढती संख्या, त्यामधून निर्माण झालेल्या रोजगार संधी पाहता यामाध्यमांच्या विस्तारासोबतच याक्षेत्राशी संबंधित नवनवीन संकल्पनांची व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण झाल्यास त्याचा उपयोग सर्व माध्यमांना पुढे घेऊन जाण्याकरिता व याक्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्यांकरिता उपयुक्त ठरू शकते. श्री. माने यांनी दिलेल्या या जबाबदारीसाठी मी त्यांचा आभारी असून संघटनेच्या वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून होतील हे आश्वस्त करतो असे केतन महामुनी यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील डिजिटल मिडियात कार्यरत युवा – ज्येष्ठ पत्रकार, गावोगावी सक्रीय यूट्यूब चॅनल्स्, वेब न्यूज पोर्टल्स् आणि डिजिटल मिडियातील सर्व प्लॅटफॉर्म्सवर संपादक, पत्रकार, वार्ताहर, फोटो व व्हिडिओ पत्रकार, टेक्निशियन्स् यांचे प्रश्न, समस्या जाणून घेत डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व मंडळींना आपल्या न्याय हक्कासाठी संघटित करण्यासाठी, डिजिटल पत्रकारितेला देखील शासन दरबारी मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी आणि वैचारिक देवाण घेवाणीतून सकारात्मकरीत्या सर्वांना प्रगतीपथावर घेऊन जाण्याच्या उद्देशाने संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी हि संघटना स्थापन केली आहे.