महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पुणे शहर सचिव पदी महेश कुगांवकर यांची निवड



 पुणे: डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या  पुणे शहर सचिव पदी महेश कुगांवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे . डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी नियुक्तीपत्र देत जाहीर केलं.

महाराष्ट्रातील डिजिटल मिडियात कार्यरत ज्येष्ठ पत्रकार, गावोगावी सक्रीय यू ट्यूब चॅनल्स्,वेब न्यूज पोर्टल्स् आणि डिजिटल मिडियातील सर्व प्लॅटफॉर्म्सवर संपादक,पत्रकार, वार्ताहर, फोटो व व्हिडिओ पत्रकार, टेक्निशियन्स् म्हणून क्रियाशील असलेल्या सर्व मान्यवरांनी केलेल्या विनंती व आग्रहामुळे मी माझ्या या सर्व सहकाऱ्यांचे संघटनात्मक नेतृत्त्व करण्याचा निर्णय घेतला.मुंबईसह राज्यातील सर्वच विभागातील संपादक-पत्रकारांच्या साथीने राजा माने यांनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र ची स्थापना केली आहे आपल्या देशात येत्या काही महिन्यांत डिजिटल मिडिया संदर्भात नवे नियम व कायदे अंमलात येणार आहेत.या पार्श्वभूमीवर डिजिटल मिडिया क्षेत्रात शिस्त यावी आणि या क्षेत्रातील प्रत्येकाला शासकीय पातळीवर अधिकृतता व मान्यता, संरक्षण आणि प्रतिष्ठा प्राप्त व्हावी,हा उद्देश घेऊन आपली संघटना वाटचालीस लागली आहे.माझ्या माहिती नुसार डिजिटल मिडिया क्षेत्रातील देशातील ही पहिलीच संघटना आहे.

महेश कुगांवकर यांनी पत्रकारीता क्षेत्रात दहा वर्ष विश्वेश समाचार या दैनिकाचे संपादक तसेच प्रकाशक म्हणून काम पाहिले आहे. कुगांवकर यांनी आतापर्यंत दहा दिवाळी अंक प्रकाशित केले आहेत. त्यांना दिग्गज आणि अभ्यासू अश्या राजा माने, डॅा विश्वास मेंहदळे, कै. डॅा. आनंद यादव, दिपक टिळक यांच्याकडून पत्रकारितेचे धडे मिळाले आहेत. याच त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या पुणे शहर सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.