प्रयेजा सिटी पूलाचा लोकार्पण सोहळा संपन्न !
पुणे: सिंहगड रोड परिसरातील सनसिटी भागातील प्रयेजा सिटी ते पुणे - बंगलोर हायवेला जोडल्या जाणाऱ्या पुलाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी पुणे शहराध्यक्ष श्री. जगदीशजी मुळीक, खडकवासला मतदारसंघाचे आमदार श्री. भिमराव अण्णा तापकीर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंतजी रासने यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. गेले 9 महिने नागरिक हा पुल नसल्याने त्रस्त होते खडकवासला धायरी कडून बेंगलोर - मुंबई हाय वे ला जाण्यासाठी हा अत्यंत उपयुक्त रस्ता आहे आताचे काम हे पूर्वीच्या पुलापेक्षा मजबूत व उंच असल्याने जास्त उपयुक्त ठरणार आहे
वडगाव आणि धायरी परिसरातून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मधुकोष, नांदेड सिटी या भागातील सर्व नागरिकांना हिंजवडी, मुंबई, साताऱ्याला जाण्यासाठी हा पूल दुवा होता. या पुलामुळे सिंहगड रस्त्याची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होत होती; मात्र पूलच वाहून गेल्याने नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. सोबतच या सगळ्याचा ताण सिंहगड रस्त्यावर येतो. सनसिटी भागातून नांदेड सिटी, सिंहगडाच्या दिशेने जाण्यासाठी हा जवळचा मार्ग होता. प्रयेजा सिटी यांच्यामधून जाणाऱ्या मुंबई-बंगरुळ महामार्गालगत सेवा रस्त्यांना जोडणारा पूल २५ सप्टेंबरच्या पावसात वाहून गेला होता त्यानंतर मागचा नव्याने बनवलेला पूल वर्ष - दिड वर्षातच वाहून गेला होता त्यानंतर हा रास्ता ९ महिने वाहतुकीस बंद ठेवला असल्याने धायरी तसेच वडगावच्या नागरिकांना वारजे किंवा मुंबई हायवे ला जाण्यासाठी बराच मोठा लांब वळसा घालून जावे लागत होते.
प्रयेजा सिटी पूलामुळे या भागातील नागरिकांचे प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. यावेळी श्री.प्रसन्नदादा जगताप,मंजुषाताई नागपुरे,सौ.ज्योतीताई गोसावी,श्री श्रीकांत जगताप, श्री दीपक नागपुरे सौ.राजश्रीताई नवले, सौ. नीताताई दांगट,श्री.हरिदास चरवड, श्री.राजाभाऊ लायगुडे,अनंत दागंट,श्री.सचिन मोरे, यांच्यासह पदाधिकारी व स्थानिक नागरीक उपस्थित होते.