महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पुणे शहराध्यक्षपदी शामल खैरनार यांची निवड


पुणे: 
ऑनलाईन माध्यमांना लोकमान्यता मिळावी यासाठी सतत धडपत असताना गेल्या १० वर्षापासून इंटरटेनमेंट आणि मिडिया क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले शामल खैरनार यांची डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्याहस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.  

महाराष्ट्रातील डिजिटल मिडियात कार्यरत ज्येष्ठ पत्रकार, गावोगावी सक्रीय यू ट्यूब चॅनल्स्, वेब न्यूज पोर्टल्स् आणि डिजिटल मिडियातील सर्व प्लॅटफॉर्म्सवर संपादक, पत्रकार, वार्ताहर, फोटो व व्हिडिओ पत्रकार, टेक्निशियन्स् म्हणून क्रियाशील असलेले सर्वच पत्रकारबांधव ऑनलाईन माध्यमांना लोकमान्यता मिळण्यासाठी धडपडत असतात. त्यामुळे, मुंबई, पुण्याससह राज्यातील सर्वच विभागातील संपादक-पत्रकारांच्या साथीने डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना उद्देशाने राजा माने यांनी स्थापना केली आहे. 

डिजिटल मिडिया क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांचे हित जोपसण्यासाठी आणि या माध्यमाला सामिजिक मुल्य तसेच सामाजिक जबाबदारीच्या चौकटीत कार्यरत ठेवण्यासाठी सदैव कार्यरत राहिल. या क्षेत्रातील प्रत्येकाला शासकीय पातळीवर अधिकृतता व मान्यता, संरक्षण आणि प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, या उद्देशाने काम करणार आहे असे शामल खैरनार यांनी सांगितले. 

आधुनिक टेक्नॉलॉजिच्या तंत्रज्ञानामुळे ऑनलाईन माध्यमांनी गेल्या काही वर्षात उतुंग भरारी घेतली आहे. परंतू, देशासह महाराष्ट्रातल्या डिजिटल मिडियाच्या विश्वासार्हतेवर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे, संदर्भात नवे नियम व कायदे अंमलात यावेत. तसेच डिजिटल मिडिया क्षेत्रात शिस्त यावी आणि या क्षेत्रातील प्रत्येकाला शासकीय पातळीवर अधिकृतता व मान्यता, संरक्षण आणि प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, ऑनलाईन माध्यमातील संघटीत व असंघटीत पत्रकार एकत्र येवून न्याय हक्कासाठी लढा द्या,या उद्देशाने राजा माने यांनी श्यामल खैरनार यांच्यावर ही महत्वपुर्ण जबाबदारी सोपवली आहे. 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.