केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चूकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, LPG गॅस, खाद्यतेलसह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या जीवघेण्या महागाई विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सप्ताहाभर जनआंदोलन आयोजित केले आहे. त्याचा एक भाग म्हणून आज जगणं हैराण करणाऱ्या महागाई विरोधात सायकल यात्रा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते विभागीय आयुक्त कार्यालय पर्यंत काढण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मा. बसवराज पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सायकल यात्रेची सुरूवात झाली. काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, प्रदेशचे उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, दत्ता बहिरट, अमीर शेख, गटनेते आबा बागुल, नगरसेवक रविंद्र धंगेकर, चंदूशेठ कदम, अविनाश बागवे, अजित दरेकर, मनीष आनंद, रफिक शेख, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, गोपाळ तिवारी, महिला अध्यक्षा सोनाली मारणे, युवक अध्यक्ष विशाल मलके, NSUI चे भुषण रानभरे, सेवादलाचे प्रकाश पवार व सेलचे प्रमुख या सायकल यात्रेमध्ये सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील म्हणाले की, ‘‘केंद्रातील मोदी सरकारच्या मागील ७ वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठिण केले आहे. दिवसेंदिवस प्रत्येक वस्तू महाग होत आहे. मोदी सरकारने जनतेला कोणताही दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला नाही. याउलट कर रूपाने करोडो रूपयांची लूट चालविली आहे. आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना केंद्र सरकारने भरमसाठ कर लावून जनतेची लूट केली आहे. केंद्र सरकारने डिझेल व पेट्रोलवर लावलेल्या भरमसाट एक्साईज ड्युटीमुळे यांचे दर वाढलेले आहे. आज पेट्रोलचे दर १०६ रू. लिटर तर डिझेलचे दर ९६ रू. लिटर झालेले आहे. स्वयंपाक गॅसचे दर ८५० रूपयांच्यावर गेलेले आहे. खाद्यतेल आणि डाळींचे भावही मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. या महागाईमुळे आज जनता त्रस्त झालेली आहे. या महागाईकडे मोदी सरकारने त्वरीत लक्ष घालून सामान्य जनतेला दिलासा दिला पाहिजे. असे न केल्यास काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडणार.’’
शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की,‘‘पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महागाई विरोधात ८ ते १६ जुलै पर्यंत जनआंदोलन आयोजित केले आहे. यु. पी. ए. सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजापेठेत कच्च्या तेलाचे भाव उच्चांक गाठलेला असताना सुध्दा पेट्रोल व डिझेलचे दर कमी होते. ते सामान्य जनतेला परवडणारे होते परंतु आज मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवून एक नवा इतिहास केला आहे. अबकी बार १०० पार अशी घोषणा द्यावी लागत आहे. मोदी सरकारच्या कारकिर्दीत सामान्य जनतेला कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत. कोरोना महामारीमुळे गोरगरीब रस्त्यावर आले आहे व मध्यम वर्गीयांच्या नोकऱ्या गेल्या आहे. अशा परिस्थितीत गोरगरीबांना महागाईच्या सामोरे जावे लागत आहे. जनतेच्या प्रश्नांबद्दल गांभीर्य नसलेल्या मोदी सरकारला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.’’
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, ‘‘जगण हैरान करणाऱ्या महागाई विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी जनआंदोलन करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार आज पासून महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जनआंदोलन आयोजित करण्यात आले आहे. यु. पी. ए. सरकारच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या नेते नरेंद्र मोदी, स्मृती इरानी व इतर नेते पट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करताना म्हणायचे, ‘जे सरकार पेट्रोल डिझेलची दर नियंत्रणात ठेवू शकत नाही त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आज मोदी सरकारने महागाईचा उच्चांक गाठला आहे त्यामुळे त्यांनी त्वरीत महागाईवर नियंत्रण आणावे अन्यथा त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. मोदी सरकारच्या उद्योगपती धार्जिणे धोरणामुळेच आज देश अधोगतीकडे जात आहे.’’
यानंतर काँग्रेसचे शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना महागाई कमी करण्यासंदर्भात निवेदन दिले.
यावेळी सायकल यात्रेत वीरेंद्र किराड, मुख्तार शेख, राजेंद्र शिरसाट, मंजूर शेख, सुनिल शिंदे, विठ्ठल गायकवाड, सुनिल घाडगे, सतिश पवार, प्रदिप परदेशी, रमेश सोनकांबळे, शोएब इनामदार, बाळासाहेब अमराळे, साहिल केदारी, सुजित यादव, शिलार रतनगिरी, शाबीर खान, वाल्मिक जगताप, गौरव बोराडे, रवि मोहिते, सुनिल पंडित, दिपक ओव्हाळ, हसन कुरेशी, सेल्वराज ॲन्थोनी, भगवान कडू, चेतन आगरवाल, मुन्नाभाई शेख, भरत सुराणा, मेहबुब नदाफ, परवेज तांबोळी, हेमंत बागुल, सौरभ अमराळे, अभिजीत रोकडे, रजिया बल्लारी, शारदा वीर आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.