पुणे: महाराष्ट्रातील डिजिटल मिडियात कार्यरत ज्येष्ठ पत्रकार, गावोगावी सक्रीय यू ट्यूब चॅनल्स्,वेब न्यूज पोर्टल्स् आणि डिजिटल मिडियातील सर्व प्लॅटफॉर्म्सवर संपादक,पत्रकार, वार्ताहर, फोटो व व्हिडिओ पत्रकार, टेक्निशियन्स् म्हणून क्रियाशील असलेल्या सर्व मान्यवरांनी केलेल्या विनंती व आग्रहामुळे मी माझ्या या सर्व सहकाऱ्यांचे संघटनात्मक नेतृत्त्व करण्याचा निर्णय घेतला. मुंबईसह राज्यातील सर्वच विभागातील संपादक-पत्रकारांच्या साथीने राजा माने यांनी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र ची स्थापना केली आहे.
हे पण वाचा, महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पुणे शहर सचिव पदी महेश कुगांवकर यांची निवड
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या पुणे शहर शाखेचे नऱ्हे परिसरात संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. तसेच यावेळी पुणे जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी पिंपरी-चिंचवडचे अविनाश चिलेकर यांघी तर उपाध्यक्षपदी हडपसरचे तुकाराम गोडसे यांची निवड करण्यात आली आहे.
हे पण वाचा, महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या प्रदेश ‘सहसचिव’ पदी केतन महामुनी यांची निवड
आपल्या देशात येत्या काही महिन्यांत डिजिटल मिडिया संदर्भात नवे नियम व कायदे अंमलात येणार आहेत.या पार्श्वभूमीवर डिजिटल मिडिया क्षेत्रात शिस्त यावी आणि या क्षेत्रातील प्रत्येकाला शासकीय पातळीवर अधिकृतता व मान्यता, संरक्षण आणि प्रतिष्ठा प्राप्त व्हावी,हा उद्देश घेऊन आपली संघटना वाटचालीस लागली आहे.माझ्या माहिती नुसार डिजिटल मिडिया क्षेत्रातील देशातील ही पहिलीच संघटना आहे.
हे पण वाचा, महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पुणे शहराध्यक्षपदी शामल खैरनार यांची निवड
याप्रसंगी संघटनेचे राज्य सरचिटणीस नंदकुमार सुतार, राज्य सहचिटणीस केतन महामुनी, पुणे शहर अध्यक्ष शामल खैरनार, शहर सचिव महेश कुगांवकर,पुणे जिल्हा सहसचिव अमोल पाटील, ज्येष्ठ पत्रकार अतुल दिक्षित, टेट्रापॅक इंडियाचे अधिकारी भगवान माने,अक्षय दिक्षित, अजिंक्य स्वामी,पराग जवळेकर,सागर किन्नरी, आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील "लॅपटॉप मॅन"साऱंग कामतेकर उपस्थित होते.