"नऱ्हे गावातील कचरा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा" भूपेंद्र मोरे

Garbage-problem-in-Narhe-village


नऱ्हे: नऱ्हे गावामध्ये मध्ये कचरा समस्या गंभीर आहे. कचरा संकलन आणि त्याचे व्यवस्थापन यावर नियोजनात्मक काम झालेले नाही. मोठ्या प्रमाणात झालेल्या बांधकामामुळे व वाढत्या नागरी वस्त्यांमुळे कचरा मोकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेला टाकला जातो. या मुळे परिसराचे सौदर्य तर नष्ट होतंच पण त्यामुळे आरोग्यविषयक प्रश्‍न निर्माण होतात. हे कचर्‍याचे डोंगर रोगजंतूची वाहतूक करणार्‍या माशा, डास, उंदीर आणि झुरळं यांच्या पैदाशीचे अड्डे बनतात. या संदर्भात भूपेंद्र मोरे यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे नऱ्हे गावचे समन्वयक दत्ताभाऊ धनकवडे यांना आज निवेदन दिले. 

Garbage-problem-in-Narhe-village

 हे पण वाचा, मुठा नदीखालून मेट्रोचा बोगदा खोदण्याच कृषी महाविद्यालय ते बुधवार पर्यंतच काम पूर्णत्वास

Garbage-problem-in-Narhe-village



आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नऱ्हे गावचे समन्वयक पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांची भेट घेऊन गावातील समस्यांबाबत चर्चा केली त्या अनुषगाने कचरा ठेकेदार याची कानउघाडणी केली गेली. तसेच इतर प्रश्नाबाबत लवकरच पूर्ण गावात फेरफटका मारून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दत्ताभाऊ धनकवडे यांनी दिले. असे भूपेंद्र मोरे यांनी सांगितले.  


Garbage-problem-in-Narhe-village

 हे पण वाचा, दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

स्वच्छच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे तसेच अस्ताव्यस्त टाकलेला सदरचा कचरा उचलून विल्हेवाट लावण्याचे काम नऱ्हे ग्रामपंचायतीकडून करण्यात येत होते. ग्राम पंचायतीकडून यापूर्वी दररोज घन कचऱ्याचे घंटा गाड्यांच्या मार्फत सुरली संकलन चालू होते परंतु महापलिकडे याचे नियोजन असल्याने मनमानी कारभार सुरु झाला आहे, आता घनकचऱ्याचे दोन तीन दिवसातून एकदा कचरा उचलत आहेत. संपुर्ण नर्हे गावात कचऱ्याचे, तुंबलेली गटारे तसेच खड्डे पडलेले रस्ते व घाणीचे साम्राज्य आहे नाले साफ सफाई होत नाही. 


हे पण वाचा, नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड

नऱ्हे भागातील बरेचश्या भागांत रोजच्या रोज उचलला जात नाही त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी कचरा रस्त्यावरच नागरीक टाकत आहेत.   कचरा उचलण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रत्येक घरातून वसुली केल्यसारखे मागीतले जात आहेत. ठराविक ठिकाणी जो कचरा साठतो तो वेळेवर न उचलल्यामुळे हायवेवरही कच-यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. कररुपी पैसे भरत आहोत तर वेगळे कच-या घेऊन जाण्यासाठी हि सक्तीची वसुली कशासाठी ? हा खरी प्रश्न आहे. नाले सफाईबाबत अजुनही काम होत नाही २ वर्षामागे ३ निरपराध लोकांनी जीव गमवला तरीही प्रशासन काहीच पावले उचलताना दिसत नाही. असेही मोरे म्हणाले.


 हे पण वाचा,

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.