पुणे: पुण्यातील बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमंदिराच्या १२४ व्या वर्षाचे निमित्त साधून मंदिराच्या वेबसाइटचे उद्घाटन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
हे पण वाचा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महारक्तदान शिबिरास उदंड नागरिकांचा उदंड प्रतिसाद
कोरोना महामारीच्या संकटकाळात या वेबसाईटमुळं भाविकांना श्रद्धापूर्वक दर्शनाचे समाधान मिळेल असं यावेळी वळसे-पाटील म्हणाले. कोरोना महामारीच्या काळात कोविडच्या काळात दोन वर्षे पोलीस रस्त्यावर उतरून काम करत आहे. कामाचा ताण वाढल्यामुळे अनेक पोलीस तणावाखाली आहेत, त्यांच्या या कामासाठी समाज पोलिसांप्रती कृतज्ञ आहे, हे ट्रस्टने केलेल्या मदतीतून दिसून येते. त्यांच्या या कामासाठी समाज पोलिसांप्रती कृतज्ञ आहे.
हे पण वाचा, ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’ बारामतीत निवेदन पाहून अजितदादांचा पारा चढला
कोरोनामुळे गणेशोत्सव, दत्तजयंती साजरी करण्यावर मर्यादा आल्यात. आपल्याला यापुढे देखील जीवनशैली बदलावी लागणार आहे. भविष्यात मंदिरात प्रत्येक प्रसंगी आपल्याला उपस्थित राहता येईलच, असे नाही. त्यामुळे सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने ऑनलाइन सुविधांवर भर ठेवणे योग्य राहणार आहे.
हे पण वाचा, दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली
यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी, कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर, खजिनदार राजू बलकवडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उपप्रमुख अॅड. रजनी उकरंडे, विश्वस्त युवराज गाडवे, अॅड. प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते.
.हे पण वाचा,
मुठा नदीखालून मेट्रोचा बोगदा खोदण्याच कृषी महाविद्यालय ते बुधवार पर्यंतच काम पूर्णत्वास