महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरूचे प्रजनन केंद्र कात्रजच्या राजीव गांधी उद्यानात, राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

 

महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरूचे प्रजनन केंद्र कात्रजच्या राजीव गांधी उद्यानात, राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

कात्रज: पुणे महापालिकेच्याह द्दीतील कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या शेकरू प्रजनन केंद्र आणि रानमांजर केंद्राचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. राज ठाकरे कात्रजच्या प्राणीसंग्रहालयाला भेट देणार असल्याने त्यांच्या अनेक समर्थकांबरोबरच प्राणी प्रेमींनीही आज येथे हजेरी लावली होती. 


हे पण वाचा, पुण्यात पर्यटनस्थळी कलम १४४ लागू, मात्र खडकवासला परिसरात पर्यटकांकडून आदेशाचं उल्लंघन सुरुच


महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून ओळखला जाणारा शेकरू, एकेकाळी गोव्यातला बऱ्याच सधन जंगलांचे वैशिष्ट्य आहे. इंडियन जायंट स्क्विरल या नावाने इंग्रजीत प्रचलित असलेली ही मोठी खार पानगळीच्या जंगलात, माडत, उंबर सारख्या झाडांवर हमखास आढळायची. शेकरू आता कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातही पाहता येणार आहे. महाराष्ट्राचा राज्य पशू म्हणून ओळख असलेला शेकरु पाहण्यासाठी त्यांचा अधिवास असलेल्या भीमाशंकरचे जंगल आणि परिसरात जावं लागत होतं. मात्र आता कात्रज उद्यानात शेकरुंचे एक जोडपे प्रजननासाठी आणण्यात आलय. त्याचबरोबर रानमांजरांची तीन जोडपीही इथं येथे आणण्यात आलेली आहेत.

हे पण वाचा, न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत


यावेळी पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ,अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे, मनसे नेते अनिल शिदोरे, नगरसेवक साईनाथ बाबर, वसंत मोरे, ऍड गणेश सातपुते, योगेश खैरे, रुपाली ठोंबरे पाटील, राजीव गांधी संग्रहालयाचे संचालक डॉ.राजकुमार जाधव आदी उपस्थित होते.


हे पण वाचा, नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड


शेकरू संबंधित माहिती. 

शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलात याचे वास्तव्य असते. अलीकडे मात्र तळकोकणात वस्त्यालगत त्याची संख्या नजरेला भरण्याइतकी वाढली आहे. विशेषतः सह्याद्रीलगत असलेल्या नारळ, पोफळींच्या बागांमध्ये हा प्राणी हमखास दर्शन देऊ लागला आहे. दाट लाल रंगाचा, आकर्षक शेपटी असलेल्या शेकरूच्या जोड्या नारळाच्या बागांमधून लीलया उड्या मारताना दिसतात. पूर्वी इतक्‍या सहज वस्त्यांलगत त्याचे दर्शन होत नसे. या प्राण्याकडून विशेषतः नारळाचे मोठे नुकसानही होत आहे.


शेकरूची भीमाशंकरच्या जंगलात आढळणारी भीमाशंकरी ही राज्यातील इतर शेकरूपेक्षा वेगळी जात आहे. भीमाशंकर, मध्य प्रदेश या भागात आढळणारे शेकरू आणि सह्याद्रीतील शेकरू यात थोडाफार फरक असतो. आतापर्यंत याचे तळकोकणात दाट जंगलात अगदी विरळ दर्शन होत असे. तो थोडा लाजरा आणि उंच झाडावर वास्तव्य करून राहणारा प्राणी आहे. त्याची घरटे बांधण्याची पद्धत वेगळी असते. एका झाडावर अनेक ठिकाणी तो घरटी बांधतो. यातील एखाद्या घरट्यातच शेकरूची मादी पिले देतो. या फसव्या घरट्यामुळे पिल्लांचे शत्रूपासून रक्षण होते. आता तो तळकोकणात वस्त्यालगत इतक्‍या मोठ्या प्रमाणात का दिसतो, याबाबत प्राणी अभ्यासकांत एकमत नाही. काहींच्या मते याची संख्या वाढली असावी; पण दुर्मिळ असल्याने संख्या वाढायलाही मर्यादा आहेत. 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.