कोल्हापूर: मुसळधार पावसामुळे कोल्हापूर शहराला महापुराचा वेढा पडला. जलशुद्धीकरणाचे प्लांटस बंद पडले. पंपिंग स्टेशनमध्ये पाणी घुसून साचल्याने पंपिंग यंत्रणा बंद पडली. त्यामुळे शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी पोहोचवणे कठीण झाले आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट झाली. त्यात कोल्हापूर महापालिकेकडे पाणी पुरवठा करणारे टँकर अपुऱ्या संख्येत आहेत. त्यामुळे कोल्हापूर महापालिका आयुक्तांनी पुण्याच्या महापालिका आयुक्ताकडे पाणी पुरवठ्यासाठी टँकरची मदत व्हावी अशी विनंती केली होती.
हे पण वाचा, संचारबंदी झुगारून सिंहगडाच्या पायथ्याशी रंगली डान्स पार्टी अन् पोलिसांनी दाखवला खाक्या
त्याअनुषंगाने पुणे महापालिकेच्या प्रभारी आयुक्तांच्या सूचनेनुसार, पुणे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे १७ मोकळे टँकर कोल्हापूरला रवाना करण्यात आले. टँकर्सबरोबर सुपरवायझर, इलेक्ट्रीशियन असे एकुण २१ जण आज सकाळी सकाळी कोल्हापूरमध्ये दाखल झाले. साधारण एक आठवड्याच्या कालावधीसाठी हे टँकर व २१ जणांची टीम कोल्हापूर मधील पिण्याच्या पाण्यासाठी मदत करणार आहेत.
https://twitter.com/PMCPune/status/1419573829957980160?s=20
हे पण वाचा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महारक्तदान शिबिरास उदंड नागरिकांचा उदंड प्रतिसाद
या कालावधीमध्ये या सर्व २१ जणांच्या टीमची निवासाची तसेच खाण्याची सम्पूर्ण सोय कोल्हापूर महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. आपत्तीच्या काळामध्ये, जितकी शक्य होईल तितकी मदत इतर शहरांना करायची पुणे महानगरपालिकेची परंपरा सुरु ठेवण्यात आलेली आहे. वेळेत व तत्काळ मदत केल्याबद्दल कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांनी पुणे महापालिकेचे आभार मानले आहेत.
हे पण वाचा,
जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच
दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली
मुठा नदीखालून मेट्रोचा बोगदा खोदण्याच कृषी महाविद्यालय ते बुधवार पर्यंतच काम पूर्णत्वास
नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड
न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई
इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली