धायरी: धायरी परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. खडकवासला धरणाजवळच गाव असून देखील प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे पालिकेला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा उभी करता आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना आजही पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. मागच्याच आठवड्यात धायरीवासियांनी रायकर मळा येथे पाण्याच्या टाकीजवळ आंदोलन केले होते.
हे पण वाचा, धायरी परिसरातील पाणीटंचाई विरोधात पाण्याच्या टाकीजवळ 'जन आक्रोश आंदोलन'
इतर भागात मुबलक पाणी पुरवठा होत असताना धायरीला मात्र दोन दिवसातून फक्त अर्धा तास पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पालिकेला कर भरून देखील आज नागरिकांना पाण्याच्या टँकरसाठी हजारो रुपये भरावे लागत आहेत. हा एक प्रकारे नागरिकांवर अन्याय होत असून त्याची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होत आहे
हे पण वाचा, प्रयेजा सिटी ते पुणे - बंगलोर हायवेला जोडला जाणारा नवीन पुल वाहतुकीस खुला
धायरी येथील रायकर मळा येथे असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी केली असता यामध्ये रायकर मळा येथील स्म्शानभूमीजवळ बुस्टर पंम्पाचे काम रखडल्याचे दिसून आले. यामुळे टाकीच्या वाहिन्या सुरु करणे शक्य होणार नाही, त्यामुळे धायरी ग्रामस्थांच्या वतीने मा. सरपंच मा. सौ. आशाताई सुनिल बेनकर यांनी पालिकेच्या अधिक्षक अभियंता (विदयुत) पाणीपुरवठा विभागाच्या मनिषा शेकटकर यांना निवेदन देऊन तात्काळ बुस्टर पंम्प बसवावा अशी मागणी केली. तसेच या परिसरातील सध्य स्थितीतील भीषण पाणीटंचाई याची माहिती देण्यात आली. त्यावर मनिषा शेकटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच पालिकेच्या वतीने बुस्टर पंम्प बसवण्यात येईल असे आश्वासन दिले.
हे पण वाचा, पुणे तिथे काय उणे? राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाहणीसाठी भाजपचे खासदार, महापौर अन् पदाधिकारी
२३ गावांचा महापालिका हद्दीमध्ये ४ वर्षापूर्वी समावेश झाला आहे. परंतु अजूनही धायरी परिसरात पाणीटंचाईची समस्या सोडवली गेली नाहीये. धायरी ग्रामपंचायतीने पाण्याच्या टाकी बनवली आहे पण महापालिका प्रशासनाकडून त्या टाकीमध्ये पाणी सोडण्यात येत नाहीये, यासाठी धायरी ग्रामस्थांकडून वारंवार अर्ज, विनंती आणि आंदोलने केली जात आहेत पण महानगरपालिका प्रशासनाकडून त्याची कोणतीही दखल घेतली जात नाहीये. शेकटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी बुस्टर पंपाचे काम चालू झाल्यानंतरच धायरीकरांची पाणी टंचाई पासून सुटका होईल.