पुणे: राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कोरोना काळात अविरत काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा प्रदेश कार्यालयात सन्मान करण्यात आला. डॉ. प्रविण बांगर – केईएम रुग्णालय, मनपातील दुय्यम अभियंता (ए वार्ड) अरुण वैद्य, आरोग्य सेवेतील रुग्णवाहिका चालक विठ्ठल बाबर,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व विघ्नहर प्रतिष्ठानचे महेंद्र पानसरे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
हे पण वाचा, पुण्यात पर्यटनस्थळी कलम १४४ लागू, मात्र खडकवासला परिसरात पर्यटकांकडून आदेशाचं उल्लंघन सुरुच
अजितदादांना भेटण्यासाठी येणाऱ्या गर्दीतल्या कोणत्याही माणसाला विचारले तर तो सांगतो आमच्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणजे अजितदादा पवार... ही दादांची खरी ताकद आहे. दादांची कमिटमेंट ही माणुसकीची असते. सत्ता हे केवळ साधन आहे, मला सत्ताधीश व्हायचं नाही तर साधनधीश व्हायचं आहे, असे दादांचे काम असल्याचे माजी आमदार, कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सांगितले.
हे पण वाचा, नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड
यावेळी मनपातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या नगरसेविका राखी जाधव, राष्ट्रवादी मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सत्कारमूर्ती डॉ. प्रवीण बांगर यांनीदेखील आपले विचार मांडले. कार्यक्रमास प्रदेश चिटणीस संजय बोरगे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, बेस्ट समितीचे सदस्य बबन कनावजे, दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष विजय वाडकर, अजितदादांचे स्वीय सहाय्यक डिकले उपस्थित होते.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रमुख शहरामध्ये सरकारी व खाजगी चार्जिंग सुविधा उभारण्यात येणार – अजित पवार
महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरूचे प्रजनन केंद्र कात्रजच्या राजीव गांधी उद्यानात, राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन