संचारबंदी झुगारून सिंहगडाच्या पायथ्याशी रंगली डान्स पार्टी अन् पोलिसांनी दाखवला खाक्या



खडकवासला: पुण्यासह  सिंहगड किल्ला, डोणजे व आजुबाजूच्या परिसरात संचारबंदी असताना सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी गोळेवाडी येथील  रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या डान्सपार्टीवर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून हॉटेल मालकासह सहा पुरुष व चार महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र या मध्ये कात्रज भागातील नामांकित हॉस्पिटलचा मालक अंधाराचा फायदा घेऊन फरार होण्यात यशस्वी झाला. 

हे पण वाचा, दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई अमोल शेडगे यांना सिंहगडाच्या पायथ्यालगत गोळेवाडी येथे रिसॉर्टमध्ये मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या आदेश झुगारवून डान्सपार्टी असल्याची माहिती मिळाली. त्या नुसार  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर क्षिरसागर, हनुमंत पासलकर, महिला पोलीस हवालदार नंदा कदम, पोलीस शिपाई मंगेश भगत, अमोल शेडगे यांच्या पथकाने काळ रात्री शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.

हे पण वाचा, मुठा नदीखालून मेट्रोचा बोगदा खोदण्याच कृषी महाविद्यालय ते बुधवार पर्यंतच काम पूर्णत्वास

याप्रकरणी हॉटेल मालमालकासह पार्टीत सहभागी असलेल्या  ५ जणांवर आणि चार महिलांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच डान्स पार्टीत सहभागी असलेला व पार्टीच्या मुख्य सुत्रधारांपैकी एक जण हा पोलीस आल्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन फरार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

हे पण वाचा, 

नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड

न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.