पुणे: राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' अंतर्गत सुधारित नियमावली जाहीर करत महापालिका आयुक्तांनी गणेशोत्सवाची नियमावलीही जाहीर केली आहे. त्यामुळे पुण्याचा ऐतिहासिक आणि वैभवशाली गणेशोत्सव यंदाही करोना संकटामुळे ढोल-ताशांच्या मिरवणुका, आकर्षक सजावटी, सामाजिक उपक्रमांच्या रेलचेलीविनाच होणार आहे. करोना संकट अद्यापही कायम असल्याने सलग दुसऱ्या वर्षीही गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आदेश राज्यशासनाने दिले आहेत. गणरायाच्या आगमनाची मिरवणूक आणि विसर्जन मिरणुकीवर पूर्णपणे बंदी असणार आहे.
हे पण वाचा, स्थायी समिती दालनासमोरच पुणे महापालिका प्रशासनास धारेवर धरत शिवसैनिकांचा राडा
गणेश मंडळांनाही सार्वजनिक रित्या गणेशोत्सव मोठ्या पद्धतीने अथवा सार्वजनिक कार्यक्रम घेता येणार नाहीत. गणेशमूर्तीच्या उंचीचीही अट घालून दिली आहे. सार्वजनिक मंडळासाठी जास्तीत जास्त 4 फूट उंचीची गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना तर घरगुती गणेशमूर्ती २ फुटांपेक्षा मोठी असू नये, असे नियम घालून देण्यात आले आहेत. तसेच श्रींच्या आगमन तसेच विसर्जनावेळी कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही, तसेच विसर्जनावेळी घरीच आरती करून नागरिकांनी विसर्जन घाटावर कोणतीही गर्दी न करता कमीत कमी वेळ थांबावे, असे आदेशात म्हटले आहे.
हे पण वाचा, देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला
गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना
- सर्व गणेश मंडळांना महापालिकेची नियमानुसार परवानगी घ्यावी लागेल
- गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. भपकेबाजपणा नसावा.
- मंडळांनी लहान मंडप उभारावेत.
- उत्सवासाठी देणगी, वर्गणी ऐच्छिक असावी. समाजपयोगी जाहिराती असाव्यात.
- आरती, भजन, कीर्तनासाठी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी
- श्रींच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन करण्यात यावी.
- गणेशमूर्ती विसर्जन कृत्रिम तलावात करावे.
हे पण वाचा, दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली
तसेच प्रशासनाने आखून दिलेल्या मर्यादेतच गणेशोत्सवासाठी मंडप उभारले जावेत, अशा सूचना सार्वजनिक गणेश मंडळांना करण्यात आली आहे. तसेच गणेशोत्सवाच्या काळात करोनाच्या नियमांमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची सोय करावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
हे पण वाचा,
जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच
दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली
न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई
इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली