पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते बारामती बाजार समितीच्या फळे व भाजीपाला हाताळणी केंद्राचं भूमीपूजन झालं. बोलताना अजित दादांनी फळे व भाजीपाला हाताळणी केंद्राचा बारामतीसह इतर तालुक्यातील फळ बाग शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. तसेच १००० कोटींचा हा प्रकल्प राज्यात सुरु असल्याचे सांगितले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशी फळे नाशवंत होऊ नये यातही हि सुविधा उभारली जाणार असल्याचे सांगितले. मात्र त्यावेळी एक कॅमेरामन विनामास्क दिसल्यानंतर, अजित पवारांनी त्यांच्या शब्दात टोलेबाजी केली. “हा बघा पठ्ठ्या, तू शूटिंग करतोय आणि मास्क काढून ठेवलाय. सांगू का पोलिसांना कारवाई करायला. तुझ्यामुळे बाजूच्याला कोरोना व्हायचा” असं अजित पवार म्हणाले.
फळांवर प्रक्रिया करण्याचे काम या प्रकल्पात काम होणार आहे. फळ बाग शतकर्यांनी पिकवलेल्या फळांना जागतिक बाजारपेठेत पाठवण्यासाठी हा प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार साहेबांनी राष्ट्रीय फलोत्पादन योजना राबवली. त्यातून मोठ्या प्रमाणात फळांचे विक्रमी उत्पादन वाढले व त्यात क्रांती झाली. आता बाराही महिने कोणत्याही मोसमात आपल्याला फळे मिळतात. ही क्रांती पवारसाहेबांच्यामुळे झाली.
चक्क! 'नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच' दाखल होणार फौजदारी गुन्हा@KirkatwadiForum@MAHESHBAPUSAHE1@MlaTapkir@sachin_dodke@PuneShivsena@pokalemahesh@supriya_sule@ChDadaPatil@parge03@PuneINC#PUNE#sinhagad
https://t.co/AzrN2c20AP
कोरोनाच्या संकटामुळे राज्य सरकारच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्र राज्याचे दीड लाख कोटी रुपयांचे उत्पन्न घटलं आहे. कोरोना महामारीच्या दोन लाटा आल्या. तिसऱ्याही लाटीची शक्यता आहे. प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे. मास्क वापरला पाहिजे. असं अजित पवार सांगत असताना समोरच प्रेस कॅमेरामॅन मास्क न घालता शूट करत होता. त्यावर बोलताना हा पठ्ठ्या बघा समोर. तू शूटिंग करतोय आणि मास्क काढून ठेवलाय. सांगू का पोलिसांना कारवाई करायला.. तुझ्यामुळे बाजूच्याला कोरोना व्हायचा, पुन्हा म्हणाल दादा लय कडक आहे, अशी फटकेबाजी अजित पवारांनी केली.